कोरेगाव भीमा – बकोरी (ता.हवेली) येथील दत्तकृपा विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सोपान वारघडे पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आलीविलास जाधव यांनी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक पार पडली. मार्केट कमिटी निवडणूक तोंडावर असल्याने ही निवड चुरशीची होईल अशी शक्यता होती परंतु सोपान वारघडे पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी संतोष तलपे यांनी घोषित केले.
यावेळी संस्थेचे संचालक काळूराम वारघडे, दत्तात्रय वारघडे, बेबी कोलते, विमल वारघडे, बापू कांबळे, किसन टूले आदी उपस्थित होते. संस्थेचे प्रभारी सचिव जाधव यांनी निवडणूक अधिकारी यांना कामकाजात मदत केली.सहकार क्षेत्रातुन समृद्धीकडे जात असताना सर्व शेतकरी, कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त चेअरमन सोपान वारघडे पाटील यांनी सांगितले. या वेळी माजी सरपंच गुलाब वारघडे, मा.उपसरपंच नामदेव वारघडे, मा.उपसरपंच शांताराम कोलते, मा.उपसरपंच सुभाष वारघडे,मा.उपसरपंच शांताराम वारघडे, मा.उपसरपंच संतोष वारघडे, संतोष सदाशिव वारघडे सत्यवान गायकवाड, महादेव जाधव,प्रल्हाद वारघडे (पाटील), मस्कु बहिरट, पै.कृष्णा कोलते, अशोक वारघडे, सुनील वारघडेतसेच मैत्री ग्रुप चे सागर वारघडे, संजय वारघडे, रामदास वारघडे, बाळासाहेब वारघडे, संजय वारघडे, महेश वारघडे, नवनाथ वारघडे याप्रसंगी उपस्थित होते. निवडीनंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी वारघडेंना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले.