सणसवाडी (ता. शिरूर) प्रा. अनिल गोटे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वतीने मराठी विषयांमध्ये “मराठी साहित्यातील वडार समाज विषयक ललित आणि ललितेतर साहित्याचा अभ्यास” या विषयात पी.एच.डी. प्रदान करण्यात आली आहे .
मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेलार, मार्गदर्शक मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे सर डॉ. प्रकाश जाधव, डॉ. रविंद्र भगत व डॉ. प्रकाश सूर्यवंशी मान्यवरांच्या वतीने अनिल गोटे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रातील भटक्या समाजाचे जीवन व साहित्यातील त्याचे स्थान याबाबत प्रबंध असून याबाबत त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.