शिरूर – प्राचार्य तुकाराम बेनके यांचे कार्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री भैरवनाथ विद्या मंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ(ता. शिरूर) येथील सत्कार समारंभप्रसंगी व्यक्त केले.
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी प्रा. जितेंद्रकुमार तानाजी थिटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेच्या माध्यमातून प्रा. थिटे करत असलेल्या कार्याचा गौरव देखील अध्यक्ष पाटील यांनी केला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय संघटनमंत्री व सोसायटीचे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, सोसायटीचे मानद सचिव किशोर पाटील, सहसचिव सतीष माने, खजिनदार सतेष शिंदे, कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषद पुण्याच्या उपाध्यक्षा प्रा रत्नप्रभा देशमुख,श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. अविनाश क्षीरसागर, उपप्राचार्य सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, भैरवनाथ सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कुमारआबा चौधरी,लक्ष्मण कोल्हे, एकनाथ बगाटे,राहुल गायकवाड,जयश्री चौधरी, संतोष थोरवे,मनोज कुमार बैसाणे,संदेश राठोड, हार्दिक पाटोळे वैभव थोरवे ,प्रशांत येवले उपस्थित होते.