पुणे – निमगाव भोगी ( ता.शिरूर) येथे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत निमगाव भोगी येथे शहिदांच्या शिलाफलकाचे अनावर करण्यात येऊन शिलाफलका समोर पंचप्राण शपथ घेण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत’मेरी मिट्टी मेरा देश’ या दिनानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेले गुलाब थोरात व इतर शूरवीरांच्या शिलाफलकाच्या अनावरण करण्यात आले.यावेळी शहीद दिवस साजरा करून गावामध्ये ३५ माजी सैनिकांचा व सहा ऑन ड्युटी सैनिकांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत निमगाव भोगी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी कारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढवल , पोलीस निरीक्षक तिडके, हवालदार पवार , त्रिदल माजी सैनिक संघटना शिरूर तालुका अध्यक्ष बबन पवार, मेजर शहाजी पवार, निमगाव माजी सैनिक संघटना अध्यक्ष राजाराम सांबरे, उपाध्यक्ष बबन फलके, निमगाव भोगी सरपंच सुप्रिया पावशे, माजी चेअरमन नवनाथ शेवाळे, चेअरमन रासकर , व्हॉईस चेअरमन गुलाब पावशे, ग्रामसेवक गवळी मॅडम, माजी सरपंच सचिन सांबारे, संजय पावशे, माजी सरपंच अंकुश इचके, निमगाव भोगी माजी सैनिक संघटना अध्यक्ष राजाराम सांबारे, माजी सैनिक महिला बचत गट व शिरूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष उज्वला इचके, शिक्षण कमिटी अध्यक्ष ताराबाई रासकर, उपाध्यक्ष सुवर्णा , मुख्याध्यापक घागरे सर, गायकवाड मॅडम, विठ्ठल जाधव मेजर उपस्थित होते.