शिरूर तालुक्यातील धामारी गावच्या भगवान जयवंत पडवळ (वय ५४ वर्षे) या नराधमावर यापूर्वीही बलात्कार, खून ,चोरीचे असे नऊ गुन्हे आहेत दाखल
पुणे – जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या आजी व नातीला कडेपठारकडे गडावर जाण्याचा जवळचा रस्ता दाखवतो असे सांगत डोंगरातील एका खोल दरीत निर्मनुष्य ठिकाणी नेत आजीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आजी समोर नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम भगवान जयवंत पडळकर या सराईत गुन्हेगाराला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहकाऱ्यांनी तसेच स्थानिक पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात बेड्या ठोकल्या असून ना सी. सी टी. व्ही फुटेज व इतर माहिती महत्वाची महैती नव्हती केवळ पीडितेच्या वर्णनावरून तयार केलेल्या स्केचच्या पोलिसांनी आरोपीच्या अवघ्या चोवीस तासात शोध घेत मुसक्या आवळल्या.
शुक्रवारी (दि. २२) सप्टेंबर रोजी या दोघीजणी खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी गडावर आल्या होत्या, दर्शन झाल्यावर त्या डोंगरातील वाटेने कडेपठारकडे निघाल्या, वाटेत आरोपी भगवान पडळकर भेटला यावेळी त्याने मी देवदर्शनासाठीच निघालो आहे. तुम्हाला जुन्या गडावर जाण्याचा जवळचा रस्ता दाखवतो असे म्हणत त्याने बरोबर येण्यास सांगितले, त्याचेवर विश्वास बसल्याने दोघीजणी त्याच्याबरोबर डोंगरातील एका खोल दरीत उतरल्या, तेथे असणाऱ्या जानाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले.
हा परिसर निर्मनुष्य असल्याने संधी साधून भगवान पडळकर याने अल्पवयीन मुलीची छेडछाड सुरू केली, मुलगी ओरडू लागल्याने आजी प्रतिकार करण्यासाठी पुढे आली तेव्हा त्याने आजीला लाथा बुक्क्याने मारहाण करीत ढकलून दिले, नातीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. आजीने आरडोओरडा केला व नातीने प्रतिकार करत अनोळखी इसमाचे डोक्यावर समोरील बाजूला दगड मारल्याने तो पळाला. हा प्रकार घडल्यानंतर दोघीजणी घाबरलेल्या अवस्थेत गावी गेल्या.घडलेला प्रकार आजी व तिचे नातीने त्यांचे राहते गावी जावून तिच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांनी दि २५ सप्टेंबर रोजी जेजूरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली.
सदर आरोपी सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील हिंगणीगाव या ठिकाणी शेतमजुरी करत असल्याची माहिती मिळताच आरोपी भगवान जयवंत पडवळ (वय ५४ वर्षे) सध्या रा. हिंगणीगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर (मुळ रा. धामार, ता. शिरूर,जि. पुणे) यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्याचेवर यापुर्वी देखील लैंगिक अत्याचार, खुन, जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे त्याने सांगितले असून न्यायालयाने आरोपीस दि. ०३ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, भोर विभाग सासवड उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.स.ई. शिवाजी ननवरे, पो.हवा.विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे पो.का.धिरज जाधव, जेजूरी पोलीस स्टेशनेचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर, स.पो.नि. मनोज नवसरे पो.स.ई.राहुल साबळे , पोलीस उपनिरीक्षक रूपाली पवार, स.फौ. सी.डी.झेंडे, पोहवा डी.एस. बनसोडे, व्ही.बी.कदम, पो.कॉ.पी.एम. शेंडे, पो.कॉ. गणेश गव्हाणे यांनी केली आहे.