श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे निषेध मोर्चा
कोरेगाव भीमा – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छञपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरश्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील श्री छञपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मोठ्या प्राणावर नागरिकांनी एकत्र येत विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे,आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार अमोल मिटकरी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारत मातेच्या पवित्र भूमीत जन्म मिळाल्याचे पाच भाग्यशाली कारणे सांगत , धर्माच्या व भाग्याचा जाणिवांचा अभाव त्यांच्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते आसे म्हणतात असे मोरे महाराजांनी मत व्यक्त केले.
यावर मोरे महाराजांनी छञपती संभाजी महाराज यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तीर्थरूप आबासाहेबांचे संकल्प ते ते करणे आम्हा अगत्य असे म्हणणारे शंभुराजे,
तसेच शहाजी राजे हिंदू धर्म जीर्णोद्धारक म्हणातात तसेच यांचे उदाहरण दिले.१६८४ साली इंग्रजांसोबत तहाच्या अटी टाकताना माझ्या प्रजेचे धर्मांतरण करता येणार नाही अशी अट टाकतात, छ्त्रपती संभाजी महाराज धर्मांतराला विरोध करतात जे जे धर्म सोडून गेले त्यांची घरवापसी करतात, सुलतानतारा नावाच्या एका सरदाराने नवलगुन येथे मंदिर पाडले त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत या देवस्थानांची ऊर्जा चालली पाहिजे, त्यांना शंभुराजे तार देतात ही हिंदुकीची गोष्ट आहे. असे ऐतिहासिक उदाहरणे देत छञपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते ठामपणे मोरे महाराजांनी सांगितले .
छञपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते कोण नाही म्हणते स्वराज्य कोणासाठी स्थापन केले कोणाविरुद्ध केले या इस्लामी पातशाह्यांना संपवण्यासाठी स्वराज्य स्थापन केल.
शेवटचे चाळीस दिवस नखापासून केसापर्यंत एक एक अवयव बाजूला होत असताना सुद्धा स्वतःच्या धेय्याप्रती समर्पित असलेला व स्वतः च्या धर्माची पायमल्ली होऊ न देता राजा आमच्यासाठी धर्मवीर आहेत.या वढूची माती हाती घ्या ती माती सांगेल ,भीमा इंद्रायणीच्या तीरावर उभे रहा ते पाणी सांगेल ,संगमेश्वराचे महादेवासमोर उभे रहा ते महादेव थरथरत सांगतील शंभूराजे धर्मवीर होते. धर्मवीर ही उपाधी छोटी होते असे म्हणतात ते योग्य नाही औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रात सुरू आहे असे म्हणत मोरे महराजांनी छञपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते असे अनेक ऐतिहासिक उदाहरण देत शिरीष महाराज मोरे यांनी सांगितले.
यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे तेरावे वंशज देहू संस्थान शिरीष महाराज मोरे, धर्म इर अध्यात्मिक सेना महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, हिंदुविर रवींद्र पडवळ, धर्मजागरण प्रमुख योगेश सासवडे, श्री तिर्थक्षेत्र वढू बुद्रुक व पंचक्रोशीतील सर्व शंभू भक्त यांच्यावतीने निषेध आंदोलन पार पडले या आंदोलनाचे नियोजन सकल हिंदू समाज श्री तिर्थक्षेत्र वढू बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले होते.