कोरेगाव भीमा – शिक्रापूर (ता.शिरूर) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून १४ जुलै २०२३ रोजी अंतराळात झेपावलेल्या ‘चंद्रयान-३’ ने चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग केले. या चंद्रयान मोहिमेद्वारे चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठणारा भारत जगाच्या पाठीवरचा पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले, याचा अभिमान असून या मोहिमेसाठी दिवस रात्र एक केलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन करत हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच रमेश गडदे,माजी सरपंच रामभाऊ सासवडे, राजेंद्र मांढरे, त्रिनयन कळमकर , दत्तात्रय गिलबिले,धनंजय हिरवे,दिलीप कोठावळे, महेश हिरवे, महंमद तांबोळी, संकेत तकटे, सचिन सायकर, निखिल गायकवाड,राहुल चीमकोडे , साहिल गजरे, भूषण कऱ्हेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळ – शिक्रापूर (ता.शिरूर) येथे चंद्रयान-३’ ने आज चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लॅंडींग केल्याबद्दल शिक्रापूर ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे केला आनंद साजरा करताना ग्रामस्थ