पुणे ग्रामीण ,पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अहमदनगर ग्रामीण, अहमदनगर महानगरपालिका, सोलापूर ग्रामीण ,सोलापूर महानगरपालिका येथील ५०० स्पर्धकांचा समावेश होता. जिल्ह्यातून विभागावर निवड झाल्याने प्रशिक्षक व ग्रामस्थांसह नागरिकांनी ओंकार गव्हाणे व क्रांती पोटफोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील कु.ओंकार विकास गव्हाणे व कू. क्रांती राजेंद्र फोटफोटे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून बारामती येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांच्यावर कोरेगाव भिमा परिसरातून मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद पुणे अंतर्गत २ व ३फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी पार पाडलेल्या विभागीय स्तरीय आंतर शालेय कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत पुणे विभागातील सोलापूर ,अहमदनगर ,पुणे व पिंपरी चिंचवड येथील खेळाडूंनी ५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
पुणे ग्रामीण ,पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अहमदनगर ग्रामीण, अहमदनगर महानगरपालिका, सोलापूर ग्रामीण ,सोलापूर महानगरपालिका येथील ५०० स्पर्धकांचा समावेश होता. जिल्ह्यातून विभागावर निवड झाल्याने प्रशिक्षक व ग्रामस्थांसह नागरिकांनी ओंकार गव्हाणे व क्रांती पोटफोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे ल.
वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील कुमार ओंकार विकास गव्हाणे व कुमारी क्रांती राजेंद्र फोटफोटे या दोघांनी विभागीय स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना पराजित करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. एकूण ५०० स्पर्धकांमधून स्वतः ला सिद्ध करत नेत्रदीपक यश प्राप्त केल्याने समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या खेळाडूंना कराटे प्रशिक्षक ईश्वर दरवडे,गणपत सोनटक्के, रणजित चव्हाण, द चॅम्पियन कराटे क्लब संस्थापक शरद फंड,क्रीडा शिक्षक रामचंद्र शिवले यांनी मार्गदर्शन केले असून पुढील स्पर्धेची तयारी कोरेगाव भिमा येथील द चॅम्पियन कराटे क्लब येथे तयारी करत आहे.
कुमार ओंकार विकास गव्हाणे हे शेतकरी कुटुंबातील असून कुमारी क्रांती फोटफोडे ही सर्वसामान्य कुटुंबातील असून दोन्ही खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.