कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केलं होतं.Aurangabad bench orders police to register case against kirtankar Indurikar Maharaj
त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर (Indurikar Maharaj) महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण नेमके काय –
विनोदी किर्तनासाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी लिंगभेदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ याबद्दल कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचे पोलिसांना आदेश केलं होतं. या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.