कोरेगाव भिमा – निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे आयोजित शिबिर प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग (युवक नेतृत्व प्रशिक्षण) नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी काळाची गरज असून भविष्यातील अनेक प्रश्नांची उकल यमध्यामातून होणार असल्याचे मत सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत आणि आर्ट ऑफ लिव्हिंग (युवक नेतृत्व प्रक्षिक्षण )तर्फे योगा, स्वछता, वृक्षारोपण आणि अद्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
निमगाव म्हाळुंगी गावात सुखं, शांती, ऐश्वर्य आणि समाधान मिळवण्यासाठी गावामध्ये भजन गायन करत पदयात्रा काढत गावातील मुख्य बाजार पेठ झाडून घेऊन स्वच्छ करण्यात आली. यावेळी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे (युवक नेतृत्व प्रक्षिक्षण) तुकाराम जावळे,अजित रणसिंग,कृष्णाजी विरोळे पाटील,प्रकाश रासकर,पांडुरंग येसादे,राजेश मुखरे, राजू कदम सर यांनी आणि प्रशिक्षनार्थी यांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन गावातील कचरा साफ करून स्वच्छता व दशक्रिया घाट आणि गावातील इतर परिसर या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली . यावेळी गावातील ग्रामस्थांनी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिक्षकांचे आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांचे कौतुक केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग (युवक नेतृत्व प्रशिक्षण )परिवाराची ग्रामस्थांच्या आरोग्याच्या आणि व्यक्तीमत्व् विकासासाठी काळाची गरज असून या परिवाराच्या माद्यमातून घडलेले युवक स्वतःच्या आरोग्यासहित सामाजिक बांधिलकी जोपासात असून मोठया प्रमाणात युवक समाजकारणाकडे वळलेले दिसत आहे. देशसेवा मोठया प्रमाणावर करताना आढळून येत आहे.अशाच प्रकारची युवक घडवायचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून केपे तर नक्कीच देशाच्या हिताचे कार्य होईल आणि देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असे मत नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अजित रणसिंग, कृष्णा विरोळे पाटील,तुकाराम जावळे, बाबुराव चौधरी या सरांनी आपली मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी तसेच गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.