सकाळी पाच वाजता स्वतः आमदार अशोक पवार यांनी वाघोली ते शिरूर असा पि एम पि एल बसने प्रवास करत नागरिकांशी साधला संवाद
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) सकाळी सहाची वेळ पि एम पि एल बसचे आगमन फटाकड्यांची आतषबाजी, गुलाबांच्या फुलांची उधळण आणि बस चालक, वाहक, प्रवासी यांना गुलाब पुष्प देत सणसवाडी करांनी वाघोली ते शिरूर शासकीय विश्रामगृह बससेवेचे जंगी स्वागत करत आमदार अशोक पवार यांचे आभार मानत बसच्या चालक व वाहक यांना दिवाळी भेट देत अनोखे स्वागत केल्याने बस कर्मचारी भारावून गेले असून आमदार अशोक पवार यांनी आमदार अशोक पवार यांची शिरूर करांना अनोखी भेट देत वाघोली ते शिरूर बस थेट सुरू केल्याने सर्वसामान्य नागरिकांना यांचा मोठा फायदा होणार आहे.
शिरूर येथील विद्यार्थी,नागरिक , रुग्ण, कामगार,व्यापारी व महिला भगिनी यांच्या मागणीनुसार आमदार अशोक पवार यांनी वाघोली ते शिरूर अशी पि एम पि एल बससेवा सुरू केली असून ही बससेवा सुरू करताना आमदार अशोक पवार हे स्वतः सकाळी पाचला वाघोली बस स्थानकावर उपस्थित राहून त्याच बसचे तिकीट काढून वाघोली ते शिरूर असा प्रवास करत सर्वांनाच एक सुखद धक्का देत चालक ,वाहक व प्रवाशी यांच्याशी संवाद साधला यावेळी शिरूरकर व नागरिकांना दिवाळीची भेट देत वाघोली ते शिरूर अशी बससेवा थेट सुरू करत शिरूर करण्याची कायमस्वरूपी दिवाळी गोड केली.
पुण्यातील वैद्यकीय,शासकीय, शैक्षणिक, व्यावसायिक ,खाजगी कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना सारखी बस बदलावी लागत असायची यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत असल्याने व मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने नागरिकांनी याबाबत आमदार अशोक पवार यांना आपली समस्या सांगितली यावर आमदार अशोक पवार यांनी याबाबत पाठपुरावा करत वाघोली ते शिरूर अशी बससेवा सुरू करत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत दिवाळीची कायमस्वरूपी अनोखी भेट देत दिली.
चालक ,वाहक व प्रवाशी यांच्यावर फुलांचा वर्षाव व फटाकड्यांच्या आतषबाजी मध्ये स्वागत – सणसवाडी आणि आमदार अशोक पवार यांचे जिव्हाळ्याचे नाते असून आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने वाघोली ते शिरूर अशी बससेवा सुरू झाल्याचा आनंद साजरा करत बसचे चालक ,वाहन व प्रवासी यांचे फुलांच्या वर्षावात व फटाकड्यांच्या आतषबाजी मध्ये स्वागत तर केलेच पण यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते चालक व वाहक यांना दिवाळीची मिठाई देत स्वागत केले.
आमदारांनी काढले बस तिकीट –आमदार अशोक पवार यांनी बससेवा सुरू करताना स्वतःसह चार सहकाऱ्यांचे तिकीट काढत प्रवास केला. यावेळी त्यांच्या सोबत वाघोली डेपो मॅनेजर वाघोटे साहेब सोबत होते. त्यांनी वाहक व चालक यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वसामान्य नागरिकांना उत्तम व दर्जेदार सेवा देत शिरूर येथील ग्रामीण भागातील नागरिकांना बस थांब्याची माहिती द्यावी व मदत करावी असे आवाहन केले.
आमदार अशोक पवार यांच्या विकासकांचा जसा आलेख उंचावणारा आहे तसाच त्यांच्या जनसंपर्क व जनसेवा व्यापक असून जनसामान्यांच्या सेवेसाठी आमदार अशोक पवार हे कायम तत्पर असून सर्वसामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखसुविधा देण्याठी कायम प्रयत्न करता असतात याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून बससेवा सुरू करताना त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव ,माजी चेअरमन सुहास दरेकर , सुदीप गुंदेचा, विजय गव्हाणे, निलेश दरेकर सुभाष दरेकर, , अशोक ढेरंगे,शाम दरेकर,प्रकाश बाबर, बिजवंत शिंदे रामेश्वर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते