स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व राजर्षी शाहू प्रतिष्ठान,दक्ष पत्रकार संघ व जागृत शोध यांच्यावतीने सरपंच सुवर्णा दरेकर यांचा सन्मान
कोरेगाव भीमा – उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) येथील सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी केलेल्या विकास कामांची दखल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व राजर्षी शाहू प्रतिष्ठान,दक्ष पत्रकार संघ व जागृत शोध यांच्या वतीने दखल घेण्यात आली असून सरपंच सुवर्णा रामदास दरेकर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील व वारकरी विचारांचा वारसा असणारे समाजभान जपणारे व समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी व्यापक काम करणाऱ्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्या कामाची दखल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य, दक्ष पत्रकार संघ व जागृत शोध यांच्या वतीने घेण्यात आली असून सरपंच सुवर्णा दरेकर यांना सन्मानित करण्यात आले असून याबाबत सन्मानपत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण कागणायात आले.
“मान कर्तृत्वाचा… सन्मान नेतृत्वाचा” आदर्श सरपंच पुरस्कार २०२३ आपणांस आदरपुर्वक सन्मानीत करण्यात येत आहे. आपण आपल्या क्षेत्रातील प्रेरणास्थान आहे. आम्हास आपला सार्थ अभिमान वाटतो, आपले निस्वार्थ सेवा कार्य जनसामान्यांना दिपस्तंभासारखे ठरावे हिच सदिच्छा आपल्या कार्याला कर्तृत्वाला आदरपूर्वक सन्मान असल्याचे प्रमाणपत्र देत आदर्श सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांना सन्मानित करण्यात आले.याबाबत सणसवाडी ग्रामस्थांनी अनानादा व्यक्त केला असून गावच्या नावलौकिकत यामुळे भर पडली असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य, दक्ष पत्रकार संघ व जागृत शोध यांच्या वतीने विकासकामे व सणसवाडी गावच्या विआलेख उंचावत असल्याची दखल घेत जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे आभारी असून जनतेची सेवा व गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून ग्रामदैवत भैरवनाथ महाराज, नरेश्र्वर महाराज यांच्या चरणी व सर्व ग्रामस्थ, मार्गदर्शक , श्रेष्ठी यांना समर्पित करत आहे –आदर्श सरपंच सुवर्णा रामदास दरेकर