Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्यातळेगाव ढमढेरे येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे

तळेगाव ढमढेरे येथील आदर्श पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे

तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) विद्यार्थ्यांमध्ये विविध सूप्त गुण दडलेले असतात. त्याचा शोध घेऊन शिक्षकांनी त्याच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, असे मत पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी आदर्श पब्लिक स्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यक्त केले.

आदर्श पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे औक्षण करून त्यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे व्यासपीठावर सादरीकरण केले.

त्यानंतर युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कवितेचा प्रवास उलगडला. कविता कशी तयार होते त्याची पार्श्वभूमी सांगत रोजच्या जगण्याच्या लढाईला कविता कशी बळ देते हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम कविता करते हे सांगत असताना त्यांनी त्यांच्या येते जगाया उभारी या कवितेचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात. ते शोधून शिक्षकांनी त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, असे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रानुमा चौधरी, स्वागत प्राचार्य अनामिका खरपुडे तर आभार चेअरमन नवनाथ खरपुडे यांनी केले.

यावेळी दक्षिण कोरियाचे कोरियन ग्रँड मास्टर चांग सेओंग डोंग, लेखक व समीक्षक प्राध्यापक कुंडलिक कदम, सिद्धिविनायक पब्लिक स्कूलचे मार्गदर्शक संचालक बाबुराव साकोरे, कवी मनोहर परदेशी, पुणे येथील भारत स्काऊट गाईडचे डेप्युटी कमिशनर आनंद सोमवंशी, मानव अधिकार फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेमधील क्रीडाशिक्षक पोपट दरंदले, मयूर भुजबळ, आदर्श पब्लिक स्कूलचे चेअरमन नवनाथ खरपुडे, प्राचार्य अनामिका खरपुडे, पांडुरंग खरपुडे, संस्थेचे उपाध्यक्ष परसराम भुजबळ ,खजिनदार सचिन शेवकर ,सदस्य दगडू राऊत ,पालक समितीचे उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी तसेच पालक समिती सदस्य,विशाखा आल्हाट, आम्रपाली आल्हाट, कुणाल आल्हाट आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!