आयुष्याला आकार देणाऱ्या कुटुंबाचे ऋण व्यक्त करण्यासाठी उद्योजक मयूर दरेकर यांनी वडिलांच्या वाढदिवसा निमित्त कुटुंबीयांना मर्सिडीज गाडी दिली भेट
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील तिशीतील तरुणाने रात्रंदिवस कष्ट करत व्यवसाय उभा केला आणि स्वकष्टाच्या कमाईवर वडील मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या वाढदिवसा संपूर्ण दरेकर कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट दिली असून या तरुणाच्या या भेटीची सध्या पुणे जिह्यात जोरदार चर्चा असून व्हायरल झालेल्या फोटोत कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट देताना व कुटुबियांच्या चेहऱ्यावरील आनंद ,अभिमान, प्रेम , आश्चर्य असे सर्व काही भाव एकत्रित दिसत आहे.
सणसवाडी येथील मयूर दरेकर या उच्चशिक्षित तरुणाने लंडन येथील नामांकित विद्यापीठात एम बी ए हे उच्च शिक्षण घेतले ,बाहेरच्या देशात गलेलठ्ठ पॅकेज मिळत असूनही कुटुंबियांच्या सोबत राहून माता, माती,कुटुंब आणि गावाची ओढ यामुळे भल्या मोठ्या पगाराची नोकरी नाकारून स्वतःचा व्यवसाय सुरु केला.यात रात्रंदिवस कष्ट घेतले. या व्यवसायात अनेकांना रोजगार देत आहे.तसेच देशातील मोठ मोठ्या ब्रँड असणाऱ्या कंपन्यांना सेवा पूर्वत असून उत्तम दर्जेदार काम, विनयशीलता, उत्तम दर्जाचे मटेरियल,आधुनिक डिझाईन, वेळेवर मिळणारी सुविधा , चोवीस तास ग्राहक सुविधा तसेच योग्य भाव व गुणवत्तापूर्ण सेवा यामुळे मयूर दरेकर यांनी अल्पावधीतच व्यवसायात आपला जम बसवला.
वारकरी संप्रदायाचा वसा असणाऱ्या शेतकरी कुटुंब म्हणजे दरेकर कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सदस्या सविता दरेकर तर मनसे पुणे जिल्हा प्रमुख रामदास दरेकर हे आई वडील तर चुलती पुणे जिल्हा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा, उद्योगनगरी सणसवाडी गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्या सुनंदा नवनाथ दरेकर या व चुलते उद्योजक नवनाथ दरेकर असे हे कुटुंब सामाजिक ,राजकीय,अध्यात्मिक, शैक्षणिक, कृषी ,सहकार, धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असून माणुसकी धर्माचे पालन करत इतरांना मदतीचा हात देणारे व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत मानवता धर्म जपणारे कुटुंब आहे. मातीशी नाळ जपणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या एकत्रित कुटुंबाला मर्चडिस गाडी भेट दिल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कौतुकाचा व आश्चर्याचा विषय बनला आहे.
विकून नव्हे तर कष्टातून…. उद्योगनगरी सणसवाडी हा औद्योगिक दृष्ट्या जलद गतीने विकसित होणाऱ्या परिसरात मोठ मोठ्या कंपन्या येत असतात, शहरीकरण होत आहे प्लॉटिंग वाढत आहे त्यामुळे येथील शेत जमिनीचे भाव गगनाला भिडले त्या विकून दादा ,भाई, आमचं काळजी,दैवत मानून कार्यकर्ते होणारी तरुणाई आलिशान गाडी,सोन्याची दागिने ,महागडे मोबाईल,गॉगल, बुट व कपडे अशा वातावरणात गुरफटत असताना मयूर दरेकर हा तरुण स्वकष्टाने रात्रंदिवस मेहनत घेत उद्योग उभा करतो आणि एकत्रित असणाऱ्या कुटुंबाला महागडी मर्सिडीज गाडी भेट देतो हाच मोलाचा कृतियुकत संदेश आहे.
एकत्रित कुटुंबच सर्वांगीण प्रगतीचा कणा –वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या शेतकरी वडील सोपानराव दरेकर व आई यमुना दरेकर मुलगा रामदास व सूनबाई सविता त्यांचा मुलगा मयूर दरेकर त्यांची पत्नी डॉ सायली दरेकर, दुसरा मुलगा प्रसिद्ध गाडा मालक व फायनल सम्राट लक्ष्मण व सूनबाई उषा दरेकर,तिसरा मुलगा नवनाथ व सूनबाई सुनंदा दरेकर यांनी अहोरात्र कष्ट करत प्रपंच उभा केला. मुलांना उच्च शिक्षित केले कष्ट… कष्ट आणि कष्ट हा मूलमंत्र जपत कुटुंबाची वाटचाल सुरू ठेवली आणि त्याच कुटुंबातील अवघ्या तिशीत आपल्या परिसासारख्या अनमोल कुटुंबाला महागडी मर्सिडीज गाडी भेट आपले ऋण व्यक्त केले.