Saturday, May 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकस्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त हीलींग लाईव्हस संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण

स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त हीलींग लाईव्हस संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण

शिरुर – निमगाव भोगी ( ता.शिरूर) येथे भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त हीलींग लाईव्हस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त हीलिंग लाइवस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र टीम मार्फत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण निमगाव भोगी तसेच शिरूरपंचक्रोशी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. शिरूर व पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदानाला प्रतिसाद देत पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच हीलिंग लाइवस च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रमातून तब्बल १०० वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.

हीलिंग लाइवस या संस्थेच्या संस्थापक मा. जानी विश्वनाथ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख माननीय संतोष सांबरे तसेच त्यांचे सहकारी संतोष शेवाळे, स्वप्निल फलके, संदीप सांबरे, सुनील पडवळ, उजवला ईचके, विठल जाधव, रमेश पुंडे ,पृथ्वीराज सांबरे व इतर यांनी हा कार्यक्रम अचूक व अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!