Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याशिक्रापूर येथे पुरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देवतीर्थ यांचे...

शिक्रापूर येथे पुरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देवतीर्थ यांचे स्वागत

कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) येथे पुरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य अधोक्षजानंद देवतीर्थ यांचेथ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.आद्य शंकराचार्य यांचे यांनी पुरी येथे गोवर्धन मठ स्थापन केला व या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादस्वामी हे होते. हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व असलेल्या पुरी पीठाधीश्वर शंकराचार्य अधोक्षजानंद देवतीर्थ यांचे स्वागतासाठी शिक्रापूर येथे अनेक मान्यवर आले होते.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, जिल्हा समन्वयक अण्णा हजारे, जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, तालुका संघटक दत्तात्रय गिलबिले ,बापूसाहेब मासळकर, वैभव ढोकले व बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गोवर्धन मठ हा आद्य शंकराचार्य यांनी श्री जगन्नाथपुरी येथे स्थापलेला एक मठ आहे. या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य ‘प्रज्ञानं ब्रम्ह’असे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस ‘आरण्य’असे लावण्याची पद्धत आहे. या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादस्वामी हे होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!