Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याशिक्रापुर पोलिसांनी नविन ट्रकची चॅसीस चोरणाऱ्या चोरटयास मुद्देमालासह केले जेरबंद.

शिक्रापुर पोलिसांनी नविन ट्रकची चॅसीस चोरणाऱ्या चोरटयास मुद्देमालासह केले जेरबंद.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन ट्रकच्या चॅसीसह आरोपीला जालना येथे केले जेरबंद

कोरेगाव भीमा – दिनांक २६ नोव्हेंबर
कंपनीमधुन बाहेर पडलेली ट्रकची नविन चॅसिस किंमत अकरा लाख रुपये किमतीची जातेगाव ( ता.शिरूर) हद्यीतील खालसा हॉटेल समोरून चोरून नेल्याची फिर्याद सरबजीत बलदेव सिंग ( रा. गोलमुरी, झारखंड): यांनी शिकापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल नविन ट्रकची चॅसिस याचा शोध घेणेसाठी शिकापुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना केल्या होत्या.

त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे ,पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक अमोल दांडगे व पोलीस अंमलदार निखील रावडे यांनी चोरीस गेलेल्या ट्रकचा मागोवा घेवुन गुप्त बातमीदाराच्या माहितीने व तांत्रीक विश्लेषणाव्दारे संबधित चोरीस गेलेली नविन ट्रकची चॅसीस व आरोपी सुरेश देवराव जगदाळे, (वय ३४ वर्षे, रा. लालवाडी, ता. अंबड, जि. जालना) यास जालना येथुन जेरबंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हेमंत शेडगे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनान्वये पोलीस नाईक भरत कोळी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अंकीत गोयल सो, अपर पोलीस अधीक्षक पुणे मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे , सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे , सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक विकास पाटील, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहीदास पारखे, भरत कोळी, पोलीस कॉन्स्टेबल निखील रावडे, लखन शिरसकर व किशोर शिवणकर पथकाने केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!