Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याNMMS परीक्षेसह NMMS व सारथी शिष्यवृत्तीमध्ये बी.जे. एसच्या विद्यार्थ्यांचा डंका

NMMS परीक्षेसह NMMS व सारथी शिष्यवृत्तीमध्ये बी.जे. एसच्या विद्यार्थ्यांचा डंका

कोरेगाव भिमा – वाघोली (ता.शिरूर) येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत बीजेएसचे १२६ विद्यार्थी उत्तीर्ण,  NMMS गुणवत्ता यादीत १७ विद्यार्थी तर सारथी शिष्यवृत्तीस ४५ विद्यार्थी पात्र झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी अभिनंदन केले आहे.

   वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाचे NMMS या परीक्षेत एकूण १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १७ विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीसाठी तर ४५ विद्यार्थी हे सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत.शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार मार्फत घेतली जाते. गुणवत्ता यादीत आलेल्या १७ विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १२००० रुपये याप्रमाणे पुढील पाच वर्षे ही शिष्यवृत्ती मिळते. तसेच सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ४५ विद्यार्थ्यांना ९६०० रु प्रतिवर्ष अशी पुढील पाच वर्षे शिष्यवृत्ती मिळते. 

   बी जे एस विद्यालया मध्ये दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असून त्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. इयत्ता आठवी मध्ये जे विद्यार्थी आहेत व ज्यांचे उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या परीक्षेत बसण्यासाठी पात्र ठरतात. विद्यालयातील एकूण २१८ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते त्यापैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत व ४५ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत. 

   उत्तीर्ण व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शांतीलालजी मुथ्था, प्रबंध समिती अध्यक्ष विलास राठोड, शाळा समिती अध्यक्ष अरुण नहार यांनी अभिनंदन केले.

या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, विद्यालयाचे शिक्षक श्री अशोक स्वामी, सौ रेश्मा शितोळे, श्री राहुल कदम, सौ.शितल कणसे,  कु.तेजस्विनी शिंदे, श्री राज गवळी  यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!