Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमACB! चंदननगर येथे पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा...

ACB! चंदननगर येथे पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा दाखल

वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती ३ लाख रुपयांची मागणी

चंदननगर (ता.हवेली) येथे वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने शुक्रवारी (ता.१७) ही कारवाई केली.

दत्तात्रय सर्जेराव शेगर असे त्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महावितरण विभागात नोकरीस आहेत.  तक्रारदाराविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात वीज मीटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. या पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शेगर यांनी पुढील कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीअंती तीन लाख रुपये लाचेची मागणी केली, असा अर्ज तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दिला. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात शेगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चंदननगर पोलिस ठाण्यात शेगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रूपेश जाधव करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!