पॅकॉलाइन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे मालक ब्राझील शेख यांनी एक लाख रुपयांचा धनादेश दिला, डिंग्रजवाडी गावाचे माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे यांनी अकरा हजार रुपयांची मदत करत सामाजिक बंधिकलकी जपली आहे
कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन ( ता.शिरूर) येथील हातावर पोट असणाऱ्या जाधव कुटुंबातील २८ वर्षीय मुलाला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून मूत्रपिंड ( किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च येणार असून जाधव कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. निलेश सूर्यकांत जाधव (वय २८) या तरुणाच्या अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान झाले असून पोटच्या गोळ्याचे दुःख आई पाहू शकली नाही आणि तिने किडनी देण्याचा निर्णय मोठ्या हिमतीने घेतला शेवटी ती आई आहे. वयाच्या २८ व्या वर्षांपर्यंत ठणठणीत असणाऱ्या मुलाला अचानक किडनी विकार उद्भवला त्याला आईची किडनी जुळली व आई कांचन सूर्यकांत जाधव ( वय ४८) किडनी देण्यास एका पायावर तयार झाली; किंबहुना किडनी देण्याचा तिने ध्यासच घेतला. पुण्यातील साधू वासवानी मिशन मेडिकल बुधराणी हॉस्पिटल येथे मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शत्रक्रिया पार पडणार आहे.
जाधव कुटुंबासमोर भावनिक व आर्थिक कसोटीचा मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे.वडील वयोवृद्ध असून रंग देण्याचे काम करत होते.आई गृहिणी असून कोरोणा नंतर कामाला नाहीत काम मिळाले तर कंत्राटी स्वरूपात काम करतात सध्या घरीच असून एक भाऊ कंत्राटी स्वरूपात कामाला आहे त्यामुळे सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.
मूत्रपिंड ( किडनी ) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पॅकोलीन कंपनी मध्ये संबधित तरुणाची आई कांचन जाधव यांनी कंत्राटी स्वरूपात मागील आठ वर्षे काम केले त्यांच्या परिस्थितीची माहिती असल्याने पॅकॉलाइन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे मालक ब्राझील शेख यांनी एक लाख रुपयांचा धनादेश दिला, डिंग्रजवाडी गावाचे माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे यांनी अकरा हजार रुपयांची मदत केली आहे सदर शस्त्रक्रियेचा साडेसात लाख रुपये खर्च असून समाजातील इतर दानशूर कंपन्या, सामाजिक संस्थांना व व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.