कोरेगाव भीमा – दिनांक १ मे
सणसवाडी ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायत कार्यालयाचे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने सणसवाडी ग्रामपंचायत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च
माध्यमिक शाळा येथील ध्वजारोहण नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र ही माँसाहेब जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संतांची, वीरांची , समाजसुधारकांची भूमी आहे. आपले आयुष्य कामगारांच्या कष्टावर व बळीराजाच्या त्यागवर अवलंबून आहे.या महान भूमीत आपला जन्म झाला हे आपले भाग्य असून आपण या मातिविषयी, कामगार, कष्टकरी, शेतकरी व मजुरांच्या विषयी कृतज्ञ राहायला हवे – नवनिर्वाचित सुवर्णा रामदास दरेकर , सणसवाडी ग्राम पंचायत
यावेळी माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे माजी सरपंच स्नेहल राजेश भुजबळ तसेच सणसवाडी ग्रामपंचायतचे बाळासाहेब गाडे,सुरेश सातपुते, संभाजी भक्तीराम दरेकर,बाळासाहेब सैद, संभाजी परशुराम दरेकर, सोनबा शिंदे , गौतम चव्हाण ,पगारे ताई , मारुती दरेकर अन्य मान्यवर उपस्थित होते.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल बबनराव दरेकर यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद विद्यार्थी,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
तदनंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी या विद्यालयातील ध्वजारोहण प्रसंगी सणसवाडी औद्योगिक विकास नगरीच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्या हस्ते करण्यात येऊन सणसवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या हस्ते तसेच शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय आनंदराव हरगुडे व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी या विद्यालयाचे प्राचार्य बाबाजी धोंडीबा गोरे सर , पर्यवेक्षिका मेंगवडे मॅडम , अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबाजी साठे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश भगवंत दरेकर, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब दरेकर , सदस्य रामदास दरेकर, नीता हरवडे , अमोल हरगुडे, रामहरी दरेकर यांच्या हस्ते सरपंच सुवर्णा ताई रामदास नाना दरेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष रंगनाथ हरगुडे होते. तसेच एन एम एस एस या परीक्षेमध्ये उत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींचा सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात करून पुढील शैक्षणिक वाटचालीस वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.