कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील नागरिकाला वीज बिल भरा अन्यथा आज रात्री वीज कनेक्शन कट होईल असा मेसेज आला त्यानंतर संबंधिताने वीज उप अभियंता बी.एस.बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता असे मेसेज आमचा विभाग पाठवत नाही त्यामुळे याबाबत सावध रहा संबधित नंबर ब्लॉक करा व आर्थिक व्यवहार टाळण्याचे आव्हान केले.फ्रॉड मॅसेज करुण तुमच्या बॅंकेतील सर्व रक्कम एका मिनटात लंपास करणारी एक टोळी सध्या चर्चेत आहे. अनेकांना या टोळीने लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे सायबर सिक्यूरिटी आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
आता ही टोळी ग्रामीण भागात सक्रिय झाली असून शेतकरी व नागरिकांनी याबाबत खात्री केल्याशिवाय ऑनलाईन व्यवहार करू नये तसेच वीज महामंडळाच्या ५६ A या नियमानुसार कोणालाच वैयक्तिक नंबरवरून ,व्हॉट्सॲपवरून ग्राहकांना नोटीस देता येत नाही त्यामुळे तुम्ही वीज बिल भरले नाही तर आज रात्री तुमची लाईट कट होईल असा मेसेज ,व्हॉट्सॲप वर आला तर दुर्लक्ष करा, संबधित नंबर ब्लॉक करा व त्यांना कॉल करण्याचा भानगडीत पडू नका.
तुम्ही जर कॅश लेस ट्रांजेक्शन जास्त करता आणि तुमच्या घरातील वीजेचे बिल तुम्ही यूपीआय किंवा ऑनलाईन पध्दतिने भरत असाल तर सावधान. कारण ही टोळी काही दिवसांत तुमच्या पर्यंत देखील पोहचू शकते. यासाठी तुम्हाला सतर्क राहायला हवे. कारण या टोळीने जवळजळ सर्वांचे क्रमांक मिळवले आहेत.तुम्ही तुमच्या वीजेचे बिल भरले आहे की नाही हे शक्यतो पटकण लक्षात राहत नाही. त्यामुळे ही टोळी एक मॅसेज करते. हा मॅसेज शक्यतो व्हॉट्सऍप किंवा मॅसेंजरमध्ये येतो. यात तुमचे लाईटीचे बील थकले आहे आणि तुम्ही ते आता भरले नाही तर महावीतरण आज रात्री तुमची वीज कापेल. असा मॅसेज असतो.रात्रीची लाईट जाणार या भितीने अनेक जण आपण विज बील भरले आहे की नाही हे न तपासताच या मॅसेजवर संपर्क साधतात. यात तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात आणि बोलन्यात तुम्हाला गुंतवूण तुमचे अकाउंट रिकामे केले जाते. आजवर अनेक व्यक्ती या टोळक्याच्या जाळ्यात फसल्याआहेत.
- अशी काळजी घ्या
- जेव्हा तुम्हाला असा मॅसेज येईल तेव्हा त्याकडे दृलक्ष करा.
- व्हॉट्सऍपवर हा मॅसेज आला असेल तर तो नंबर तात्काळ रिपोर्ट आणि ब्लॉक करा.
- शक्यतो कॉल करूच नका, कोणतीही माहिती अथवा ओटीपी कुणालाच सांगू नका.
- जर तुम्ही चुकून त्यांना कॉल केला आणि त्यांच्या बोलण्यात काही वेगळ्या हलचाली जाणवल्या तर तुमची खरी माहिती त्यांना देऊ नका.
- सावध रहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
विद्युत अधिनियमातील कलम ५६मधील तरतुदीनुसार, वीज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते, त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही तर वीज कंपनीने ग्राहकास विद्युत डिस्कनेक्शन नोटीस हे महावितरणच्या अधिकृत संकेत स्थळावरून वरून मेसेज पाठवण्यात येते . कोणत्याही अनधिकृत मोबाईल क्रमांक वरून नोटीस पाठवत नाही याची नोंद घ्यावी व अशा बोगस क्रमांकावर व्यवहार करू नये यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते त्यामुळे सर्वांनी सतर्क व जागरूक राहणे गरजेचे आहे. – उप अभियंता बी एस बिराजदार, शाखा कोरेगाव भिमा