वढू बुद्रुक – दिनांक २६ फेब्रुवारी
शिबिराचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी २१४२ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली अनोखी शंभूनिष्ठा व भक्ती व्यक्त केली असून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास प्रारंभी शंभू भक्तांनी सामाजिक जाणीव, कृतज्ञता व रुग्णांची सहाय्यासाठी एक सामाजिक व विधायक उपक्रम राबवून धर्मवीर छञपती संभाजी महाराजांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
श्री शंभूछत्रपतींनी स्वराज्यासाठी एक महिना मरणयातना सहन करुन फाल्गुन अमावस्येला आपला प्राणाचे बलीदान दिले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांचे स्मरण म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील शंभूराजांच्या समाधीस्थळावर श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान पुणे यांच्यावतीने रक्तदान आयोजीत करण्यात आले होते. शंभुभक्तांनि रक्तदान करत अनोखे अभिवादन करत बलीदान मासाची सुरुवात करण्यात आली आहे.
मागील वर्षी या रक्तदान २०२१ मध्ये ३०४ रक्तदात्यांनी, २०२२ मध्ये १००४ शंभुभक्तांनी रक्तदान केले होते. यावेळी एक अनोखा विक्रम रचत २१४२ शंभू भक्तांनी रक्तदान केले.तसेच पुढील वर्षी ५१०० रक्त बाटल्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न करणार आसल्याचे आयिकानकांनी सांगितले .यावेळी अक्षय ब्लड बँक आणि पी.एस.आय या दोन रक्त पेढ्या येथे उपस्थित होत्या. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला शंभूराजांची प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात आले.
आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले याची जाणीव म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे शंभू भक्तांनी व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी सांगितले
बलिदान मासाचे महत्व व पाळण्याचे कारण – ज्यावेळी मुकरर्बखानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले तिथपासून ते महाराजांचे बलिदान हा संपूर्ण एक महिना म्हणजे बलिदान मास होय. महाराजांनी जो पुढे ४० दिवस अत्याचार सहन केला त्याची जाणीव प्रत्येकाला असावी म्हणून बलिदान मास पाळण्यात येतो.
यामध्ये महिनाभर चप्पल न घालणे, गोड पदार्थ वर्ज करणे, चहा बंद करणे, सुखाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ किंवा आवडती वस्तू यांचा त्याग करणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे आदी गोष्टी पाळण्यात येतात. सलग ४० दिवस नियमितपणे या ठिकाणी श्लोक पठण करण्यात येणार आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी २१ मार्च रोजी ३३४ वी पुण्यतिथी असून यावेळी सर्व शंभूभक्तांनि उपस्थित राहून अभिवादन करण्यासाठी यावे. – सरपंच सारिका अंकुश शिवले, वढू बुद्रुक.