Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याबापाची डॉक्टरकीची इच्छा पूर्ण करुन मानसिची गवसणी थेट आयआरएसला..!

बापाची डॉक्टरकीची इच्छा पूर्ण करुन मानसिची गवसणी थेट आयआरएसला..!


शिक्रापूर ता.२५
केवळ गरीबीमुळे डॉक्टर होता न आलेल्या केंदूर (ता.शिरूर) येथील नानाभाऊ भागुजी साकोरे यांच्या तीनही आपत्यांनी आपल्या बापाची अपूर्ण इच्छा पूर्ण तर केलीच शिवाय धाकट्या डॉ.मानसीने नुकतेच युपीएससीच्या भारतीय महसूल सेवेच्या (IRS) परीक्षेतही यश मिळविले. या तिच्या यशाने तिच्यासह संपूर्ण परिवाराचे परिसरात कौतुक होत आहे.
नानाभाऊ भागुजी साकोरे सन १९८०च्या बॅचचे केंदूर येथील हायस्कूलमध्ये सर्वोत्तम गुण मिळवून इयत्ता दहावीत यशस्वी झाले होते. आई-वडील अगदी आडाणी आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. नानाभाऊंना त्याकाळी डॉक्टर व्हायचे होते पण ना कुणाचे मार्गदर्शन ना दिशा. पर्यायाने अभियांत्रिकीत पद्वी प्राप्त करुन ते मिलीट्री इंजिनिअरींग सर्व्हीसमध्ये रुजू झाले. अर्थात त्यांची मुळची डॉक्टरकीची भूक त्यांनी त्यांच्या मुलांकरवी तृप्त केली ती अशी की, पहिली मुलगी डॉ.दिपीका एमबीबीएस झाली तर लागोलाग डॉ. मानसीही बीडीएस आणि एमडीएस उत्तीर्ण झाली. धाकटा मुलगा डॉ.जय हाही कोल्हापूरातून एमबीबीस झाला. दरम्यान या भावंडांमध्ये मधवी असलेली डॉ.मानसी हीने केवळ डॉक्टर होवून थांबली नाही तर तिने मागील वर्षी युपीएससीच्या विविध परीक्षांसाठी प्रयत्न सुरू केले आणि दूस-याच प्रयत्नात ती भारतीय महसूल सेवेच्या (IRS) परीक्षेतही ती यावर्षी नुकतीच उत्तीर्ण झाली.
दरम्यान आई रंजना आणि वडील नानाभाऊ यांचेसह मामा रामभाऊ शेटे, संपूर्ण साकोरे परिवर, शेटे परिवार, सर्व मावश्या आणि त्यांच्या घरातील सर्वांनी ज्या पध्दतीने कुटुंब म्हणून प्रेरणा दिली आणि आधार दिला त्यामुळेच मी वडीलांच्या डॉक्टरकीच्या इच्छेसह आता आयआरएस परीक्षेतही यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया मानसिने दिली. दरम्यान मानसीची मोठी बहीण डॉ.दिपीका हिचे पती कृष्णांत पाटील हे आयएएस अधिकारी असून त्यांनीही मानसिला उत्तम मार्गदर्शन केल्याची माहिती साकोरे परिवाराचे वतीने देण्यात आली.

उच्चशिक्षणाची प्रेरणा शेटेदादांचीच….!
केंदूरचे माजी सरपंच दिवंगत अर्जुनराव शेटे हे मानसिचे आजोबा शेटेदादा म्हणून संपूर्ण शिरुर तालुक्यात परिचित होते. त्यांचे माजी आमदार दिवंगत रावसाहेबदादा पवार व बापूसाहेब थिटे यांच्या राजकीय यशात मोठे योगदान होते. एवढे होतानाही शेटेदादांनी जुन्याकाळी आपली दोन मुले व चार मुलींच्या उच्चशिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांच्या प्रेरणेनेच डॉ.मानसीसह संपूर्ण शेटे व साकोरे परिवाराला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे साकोरे परिवाराचे वतीने सांगण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!