कोरेगाव भीमा - पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये महिलांसाठी मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर संपन्न झाले. तर के ई एम हॉस्पिटल च्या वतीने गर्भाशय मुखाची तपासणी (सर्व्हायकल कॅन्सर स्क्रिनिंग) कॅम्पचे आयोजन करून महिलांची तपासणी करण्यात आली,यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित महिलांना आरोग्याविषयीची काळजी घेण्याविषयी डॉ अरुण गोंधळी यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळे जगतापच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा नितीन कुसेकर ,अनिता सुंदरलाल दौंडकर, शुभांगी स्वप्नील शेळके, दिपाली राजेंद्र तांबे, सुनिता बेंडभर तसेच उपकेंद्रामधील परिचारिका आशा वर्कर यांनी महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून ह्या आजाराबाबत जनजागृती केली उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर , परीचारीका या सर्वांच्या मेहनतीमुळे तपासणी शिबिर संपन्न झाले.