तब्बल सहा राज्यात आरोपी सतत स्थलांतर करत असूनही शिक्रापूर पोलीसांनी तांत्रिक विविविश्लेषणाद्वारे ठोकल्या बेड्या
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता शिरूर)
येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी बँगलोर येथून ताब्यात घेतले असून तब्बल दिड महिना पोलीस प्रशासनाला गुंगारा देत तब्बल सहा राज्यात सतत स्थलांतर करणाऱ्या आरोपीला सी.सी.टी.व्ही फुटेज बारकाईने तपासुन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पहिल्या पतीचा दुसऱ्या पतीनेच खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
मयत इसम सुशांत अनिल करकरमर (वय ४६ वर्षे) हा आरोपीचे पत्नीचा पहीला पती असून प्रदीप बलराम गराई या आरोपीने त्याचे पत्नीचे मयत इसमा सोबत चारीत्रा संशय घेवुन मयत इसमाचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.यामुळें परिसरात मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कोरेगाव भिमा येथे दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ०६:०० वा. सुमारास तुळजाभवानी नगर येथील रफीक अब्दुल पठाण यांचे बिल्डींगमध्ये सुशांत अनिल करकरमर (वय ४६ वर्षे) यांचा अज्ञात कारणावरून कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करून हत्या करण्यात आली होती.
सदर गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सी.सी.टी.व्ही फुटेज बारकाई तपासुन तसेच साक्षीदार यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे तपास करून सदर गुन्हयात प्रदीप बलराम गराई (रा. पांचाल ता. सोनमुखी जि. बाकुडा पश्चीम बंगाल हल्ली रा. उबाळेनगर वाघोली ता.हवेली ) यास निष्पन्न केले आहे. मयत इसम हा आरोपीचे पत्नीचा पहीला पती आहे. आरोपीने त्याचे पत्नीचे मयत इसमा सोबत चारीत्रा संशय घेवुन मयत इसमाचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी हा गुन्हा घडले पासुन सुमारे दीड महिना फरार होता. सदर आरोपी बाबत माहिती काढली असता तो वांरवार पोलीसांना गुंगारा देण्याचे हेतुने ओरीसा, तामिळनाडु, कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, बंगलोर, कर्नाटकात येये ये ना करीत होता. सदर आरोपी एक जागेवर न थांबत वारंवार त्याचे राहण्याचा ठिकाणा बदलत असे त्यामुळे सदर आरोपी मिळुन येत नव्हता. म्हणुन सदर आरोपीचे हालचालींवर तांत्रिक विश्लेषणाव्दारे नजर त्याचे शोधाकरीता वेगवेगळी पथके नेमली होती व त्यांचे मार्फत आरोपीचा शोध घेण्याचे काम चालु होते.
आरोपी प्रदीप बलराम गराई हा बंगलोर येथे असल्याचे माहिती मिळताच तात्काळ सदर आरोपीचा शोध घेणे कामी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस कॉन्स्टेबल निरन पिसाळ यांनी बँगलोर येथे आरोपीचा गोपणीय रित्या शोध घेवुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी ही पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकीत गोयल , अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर शिक्रापुर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, पलीस नाईक शिवाजी चितारे यांनी केलेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस कॉन्स्टेबल निरन पिसाळ करत आहेत.