कोरेगाव भीमा ,- वढू बुद्रुक ( ता.शिरूर) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमियेथील ग्राम पंचायतीचे ध्वजवंदन सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या हस्ते पार पडले.
वढू बुद्रुक ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केंद्रशासनाच्या हर घर तिरंगा याविषयी जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी हर घर तिरंगा नुसार हातात तिरंगा घेत जनजागृती करत मानवी साखळी करत अनोखे अभिवादन केले.
यावेळी सरपंच सारीका अंकुश शिवले, माजी सरपंच व चेअरमन प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले , अनिल शिवले, उपसरपंच राहुल कुंभार , माजी उपसरपंच लालाशेठ तांबे, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे, कृष्णा आरगडे अंजली शिवले, शिलावती भंडारे , रोहीनी भंडारे, माजी चेरमण राजेंद्र आहेर, संजय शिवले , ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश शिवले , शिक्षक वृंद ग्रामस्थ व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते..