जात तोडो समाज जोडो यासाठी उत्तरप्रदेशातील भीमा भारती या भीम सैनिकाने सायकलवर प्रवास
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील जय स्तंभ अभिवादन सोहळ्याला मानवंदना देण्यासाठी उत्तरप्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील एका भीम सैनिकाने सायकलवर २१०० किलोमिटर प्रवास केला असून नागपूर येथील दीक्षाभूमीवर नतमस्तक झाल्यानंतर ३१ डिसेंबरला सकाळी १०.१५ ला जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दाखल झाला आहे.
यावेळी त्यांचे जय्यत स्वागत धम्म भंते यांनी केले असून भीमा भारती यांनी उत्तरप्रदेश आग्रा, नागपूर, औरंगाबाद , अहमदनगर, पुणे, कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दाखल झाला आहे.
जाती अंतासाठी त्याने आपला लढा उभारला असून यासाठी त्याने अनोखा मार्ग अवलंबला आहे.या तरुणाने उत्तरप्रदेश ते कोरेगाव भिमा हा सायकलवर प्रवास करत जाती अंत होऊन समाज जोडला जावा या विचाराच्या समर्थनार्थ जाती तोडो समाज जोडो यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.