Friday, June 21, 2024
Homeक्राइमहडपसर पोलिसांनी दुचाकी चोरास साथीदारासह केले जेरबंद

हडपसर पोलिसांनी दुचाकी चोरास साथीदारासह केले जेरबंद

हडपसर येथे अटक केलेल्या सराईत वाहन चोरासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व पोलीस कर्मचारी

पाच दुचक्यांसह २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

हडपसर – हडपसर (ता.हवेली) शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून २९५ हजारांची वाहने जप्त करण्यात आली. आरोपींनी हडपसर,वानवडी सह शिवाजीनगर परिसरात दुचाकी चोरी केली होती.

आशिष श्रीनाथ गायकवाड (वय १९ वर्षे) रा.आनंदनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून ५ वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले असून किं.रू २,९५,००० मुद्देमालामध्ये द बजाज सीटी १०० , हिरो स्प्लेंडर एनएक्सजी आयस्मार्ट , होंडा ॲक्टिव्हाश , होंडा सीबी शाईन , होंडा युनिकॉर्न अशा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . हडपसर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत वाहनचोर रामटेकडी परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ आणि सुरज कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आशिष गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार आशिष साबळे (रा. मांजरी ) याच्या मदतीने हडपसर, वानवडी आणि शिवाजीनगर परिसरातून वाहनचोरी केल्याची कबुली दिली.

सदर कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे यांनी केली.

संबधित सराईत वाहनचोराची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने सापळा लावत त्याला ताब्यात घेतले व चौकशीत त्याने साथीदारासह विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून अधिक तपास करण्यात येत आहे. – अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!