Sunday, September 15, 2024
Homeक्राइमहडपसर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ..कुठलाही पुरावा नसताना मांजरी येथे महिलेच्या खुनातील आरोपीला...

हडपसर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ..कुठलाही पुरावा नसताना मांजरी येथे महिलेच्या खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या 

सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले, ३०० रिक्षांची कसून चौकशी,  ५० हजारांचे बक्षीस, तसेच विविध प्रकारे तपासाची चक्रे फिरवत पकडला आरोपी

पुणे – मांजरी (बु), मांजराई व्हिलेज, मांजरी रेल्वे स्टेशन जवळ,  येथे एका अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस महिलेचा मृतदेह मिळून आला होता.सादर महिला व तिच्या खुनाबद्दल कसलाही पुरावा उपलब्ध नव्हता. यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली,जंग जंग पछाडले,प्रसंगी आरोपीवर ५० हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले. समाज माध्यमावर समधित आरोपी व महिला यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि अनोळखी महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. 

विक्रम ऊर्फ बाळू रघुनाथ जाधव, (वय ३०, रा. मुळगाव महाळंग्रा, ता. चाकुर जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रेल्वे स्थानकाबाहेर एका अज्ञात महिलेचा मांजराई व्हिलेज या ठिकाणी ७ एप्रिलला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एक महिना झाला तरी माहिती मिळत नसल्याने पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी बातमीच्या माध्यमातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच या व्हिडीओतील आरोपी व मयत महिलेची माहिती देणाऱ्याला ५०  हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना बेवारस मयत महिलेस नक्की मरण कधी आले हे माहीत नसल्याने व कोणताही उपयुक्त पुरावा नसल्याने दिनांक ०६ एप्रिलच्या पुर्वीच्या पासूनचे सुमारे १०० सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता मयत महिलेस सिरम इन्स्टिट्यूट येथून मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत शेअर रिक्षामध्ये घेऊन गेल्याचे दिसून आले. या रिक्षावर असलेल्या जाहिरातीवरून ३०० रिक्षांची माहीती घेतली. त्यातून १ एप्रिल रोजी  आरोपीने प्रवास केलेली रिक्षा शोधून चौकशी करण्यात आली. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इसम हा यवत भागात राहत असल्याची माहिती तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे यांना मिळाली.

दरम्यान, मिळालेल्या बातमीवरून हडपसर तपास पथकाने सदर भाग पिंजुन काढत दाखल गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ बाळू रघुनाथ जाधव याला शनिवारी (ता. ११) ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते हे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  हडपसर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे,  पोनि. (गुन्हे)मंगल मोढवे, पोनि. (गुन्हे) उमेश गित्ते, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरूध्द सोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!