Sunday, September 15, 2024
Homeक्राइमहडपसर पोलिसांकडून आरोपीची माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस देत नाव ठेवणार गोपनीय...

हडपसर पोलिसांकडून आरोपीची माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस देत नाव ठेवणार गोपनीय – पोलीस निरीक्षक संतोष पांढरे

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका महिलेचा खून करणाऱ्या आरोपीविषयी माहिती दिल्यास संबंधिताला ५० हजाराचे बक्षीस दिले जाईल. तसेच त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी हमी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.

सदर महिलेचा खून हा ६ एप्रिल २०२४ रोजी मांजरी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या एका वसाहतीच्या शेजारी झाला होता. खून प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहे. हडपसर पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू असून त्याचा एक व्हिडीओ व काही फोटो पोलिसांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी रोख ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

याबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे – 9923139779, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे – 9420224430, तसेच पोलीस निरीक्षक महेश कवळे 9689956992 यांच्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!