Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यास्वाभिमानी शिवसैनिकांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलीय - सचिन अहिर

स्वाभिमानी शिवसैनिकांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलीय – सचिन अहिर

वाघोलीत संजय सातव यांच्या नियोजनाखाली शिरूर-हवेलीतील शिवसेना कार्यकर्त्यांची निर्धार बैठक संपन्न

वाघोली (ता.शिरूर)  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते एकनिष्ठ स्वाभिमानी आहेत. सर्वांनी जागृत राहून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ साधून आली असून शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांचे काम करीत आघाडीचा धर्म पाळून कोल्हेना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे अवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले.

  यापुढे बोलताना अहिर यांनी , ‘शिरूर लोकसभा मतदार संघात शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असून या दोन्ही तालुक्यात आपल्या शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचे जाळे पसरलेले आहे.त्यामुळे शिरूर-हवेलीत पदाधिकाऱ्यांनी ब  कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ व पक्षनिष्ठ काम करून शिवसेनेची ताकद दाखवण्याची वेळ आल्याचे सांगितले. 

   वाघोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील यांच्या अमृत पॅलेस बंगला परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर व जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड व शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक व महिला भगिनी व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. 

   शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, माजी उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील,जिल्हा सल्लगार राजेंद्र पायगुडे यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले.तर युवा सेनेचे राज्य सहसचिव विशाल सातव पाटील यांनी आभार मानले.बैठकीचे आयोजन नियोजन शिवसेनेचे नेते संजय सातव पाटील यांनी केले.

     या  प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील,पुणे जिल्हा सल्लागार राजेंद्र पायगुडे,युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सह सचिव विशाल सातव पाटील,वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख युवराज दळवी,शिरूर शहर प्रमुख संजय देशमुख,शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार, उपतालुका प्रमुख अनिल पवार,वाघोली शहरप्रमुख दत्तात्रय बेंडावले,महिला आघाडीच्या माजी तालुका संघटक सविता कांचन,पंचायत समितीचे माजी सदस्य काळुराम मेमाणे,पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव,शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्व्यक अलका सोनवणे,महिला नेत्या मीना संजय सातव पाटील,शैलेश जाधव,वसंत जाधवराव,ओंकार तुपे,बाळासाहेब सातव,सचिन कांचन,भानुदास सातव,उत्तमराव लोले,रोहन दळवी,मच्छिन्द्र गदादे,गुलाब गायकवाड,किशोर पाटोळे,माऊली शिवले,कैलास भोसले, राजेंद्र शिंदे, शिवाजी मचाले,श्रेयश वलठे,अजय माने,नितीन जगताप,आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर- हवेलीतील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!