Saturday, September 14, 2024
Homeताज्या बातम्यास्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे संस्थापक राजेशसिंह ढेरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे संस्थापक राजेशसिंह ढेरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

प्रत्येक रक्तदात्याला देण्यात आले सुरक्षेसाठी हेल्मेट भेट

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन विनर्स स्कूल येथे करण्यात आले होते.यावेळी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व हेल्मेट भेट देण्यात आले.

   कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दिप प्रज्वलन सरपंच संदिप ढेरंगे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, केशव फडतरे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी उपसरपंच संदीप गव्हाणे, माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेंद्र भांडवलकर माजी चेअरमन रामभाऊ ढेरंगे, माजी उपसरपंच संदीप गव्हाणे, जालिंदर ढेरंगे, भाजपाचे तानाजी ढेरंगे यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी समीर ढेरंगे यांनी पाहिले रक्तदान करत रक्तदानाची सुरुवात करण्यात आली. वामन भांडवलकर , झपके, सतीश गव्हाणे, ईश्वर सुतार, प्रकाश गव्हाणे, शालेय समितीचे संदिप ढेरंगे, तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला. पूना ब्लड सेंटर यांच्यावतीने डॉ महेश रणदिवे, डॉ संतोष साठे, डॉ.नामदेव चव्हाण, डॉ शुभम यादव, डॉ चैतन्य , सिस्टर धनश्री वाव्हाळ, सृष्टी एरणे,सोनल, अजय यांनी रक्त संकलन केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गव्हाणे यांनी केले.

उद्योजकांचा ग्रुप आणि त्यातून उभारलेले उद्योग – भागीदारीत उद्योग उभा करत त्याला यशस्वी चालवण्यासाठी तसेच त्यातून पुन्हा नवीन उद्योग सुरू करणे हे राजेशसिंह ढेरंगे,सुधाकर ढेरंगे, अमीर इनामदार, हेमंत ढेरंगे, शौकत इनामदार यांनी आनंद महिरा पॅकेजिंग कंपनी, पेट्रोल पंप,पतसंस्था अशा विविध ठिकाणी यशस्वी भागीदारी करत उद्योग उभारण्यासह त्यांनी राष्ट्रीय पक्षाची स्थापना करत विनर्स इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना करत वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभाग देत असतात

 रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान त्यातून मिळेल जिवदान असा विचार करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून एखाद्याचा प्राण वाचल्याने ते कुटुंबात आनंदात असणे हेच मोठे कार्य होणार आहे.सर्वांनी रक्तदान करायला हवे. –  राजेश सिंह ढेरंगे, संस्थापक अध्यक्ष स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्ष

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!