Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यास्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेशसिंह ढेरंगे यांची बिनविरोध निवड

स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेशसिंह ढेरंगे यांची बिनविरोध निवड

स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

पुणे – दिनांक ३० मे रोजी झालेल्या स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांच्यावर कार्यकारिणीने  विश्वासाने व एक मताने पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

  महाराष्ट्र विधानसभे साठी ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा व आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका लक्षात घेता नवीन कार्यकारिणीची निवड महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

          राष्ट्रीय कार्यकारणी २०२४ ते २०२७ कालावधीतील राजेशसिंह देवराम ढेरंगे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी, दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे यांची उपाध्यक्षपदी, अमीर बशीर इनामदार यांची राष्ट्रीय महासचिव, राहुल सुखदेव ढेरंगे यांची सहसचिव ,  रामदास साहेबराव ढेरंगे यांची खजिनदार पदी तर सदस्य म्हणून सतीश आप्पासो गव्हाणे, नितीन पांडुरंग राऊत, सचिन बाळासाहेब वारघडे, विशाल बंडू कोतवाल,अमोल बाळासाहेब जगताप यांची तर राष्ट्रीय प्रवके म्हणून ॲड. मोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!