Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्यास्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल

स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर लोकसभेसाठी एकूण ४६ अर्ज दाखल

पुणे – शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतं असताना शेवटच्या २५ एप्रिल रोजी अडीच वाजेपर्यंत ४६ अर्ज दाखल झाले असून यामध्ये स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी अर्ज दाखल केला आहे.

    छञपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर समाजसुधारक यांच्या विचारांना मानणारे  व ज्ञात अज्ञात क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शहीद सैनिक यांच्या स्मृतीस अभिवादन करत रयतेच्या (सर्वसामान्य जनतेच्या)  कल्याणासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वसामान्य माणूस, कामकरी, कष्टकऱ्यांचा व शेकातकऱ्यांचा दुःखाला  वाचा फोडण्यासाठी व लोकसभेत बुलंद आवाज गर्जवण्यासाठी ही लोकसभा निवडणूक लढवली जाणार असून राजकारणाचा ढासळलेला  दर्जा व लोप पावलेली नीतिमत्ता यांना बदलण्यासाठी तसेच राजकारण हे समाजासाठी व देशाच्या प्रगतीसाठी करायचे असून पुन्हा एकदा  राजकारणाला  सुवर्णमय करणेसाठी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश सिंह ढेरंगे यांनी सांगितले.

      यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्याकडे अर्ज दाखल करताना पक्षाचे राष्ट्रीय सचिव अमीर इनामदार, ॲड.मोहम्मद शेख उपस्थित होते.

     पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे या तीनही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व उमेदवारांनी गर्दी केली होती शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून एकूण ४६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या तीनही मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवारी सकाळी होणार आहे. त्यानंतर अर्ज माघारीनंतर म्हणजे सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे या  मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र सोमवारीच स्पष्ट होणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!