Friday, June 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?? डॉ अमोल कोल्हे

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?? डॉ अमोल कोल्हे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरत सरकारची कार्यपद्धती बघून गांधींजींच्या तीन माकडांची आठवण झाली.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांनी संसदेत दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा संतप्त सावल उपस्थित केला.हा प्रस्ताव मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विकास झाल्याचा आणि मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे सांगते. मात्र, दरडोई उत्पन्न किती वाढले? यावर मात्र मौन बाळगते. कृषी क्षेत्रात मोठा विकास झाल्याचे हे सरकार सांगते मात्र, शेतीसाठी लागणारे खत, कीटकनाशकं, औषधे याच्या किमतीही किती मोठ्या प्रमाणात वाढल्या यावर मौन बाळगले जाते.

मोदी सरकारची कार्यपद्धतीन पाहून महात्मा गांधी यांची तीन माकडे आठवतात, असा टोलाही त्यांनी लगावला.’लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, लोकमान्य टिळक यांच्याच शब्दात मी प्रश्न विचारु इच्छितो, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? याचेही आत्मचिंतन होणे आवश्यक आहे.कॉंग्रसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करताना लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

यावेळी त्यांनी भारताच्या दरडोई उत्पन्नात भारताची झालेली दुरावस्था आणि शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारची तुलना गांधीजींच्या माकडांशी केली. खासदार कोल्हेंनी सरकारला लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक वाक्याचीही आठवणी करुन दिली. अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “मी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ उभा आहे. सरकारच्या कार्यपद्धतीला बघून गांधीजींच्या तीन माकडांची आठवण येते. सरकारविरोधात काहीही ऐकू नका,निवडणूक सोडून देशाची अवस्था बघू नका, विरोधी पक्षांच्या नेत्यांना शांत करुन त्यांची बोलती बंद करा. कसा विश्वास करणार या सरकारचा जे महागाईवर बोलत नाही, जे आर्थिक विकासाचे आकडे फेकतात, मात्र व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नावर बोलत नाही.”त्यानंतर अमोल कोल्हेंनी सभागृहाचं लक्ष्य दर डोई उत्पन्नावर आणण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले की, “गृहमंत्र्यांनी काल खुप छान गोष्ट केली. ते म्हणाले की आकडे कधी खोटं बोलत नाही. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचते, तेव्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देश १४१व्या स्थानावर घसरलाय. देशाची संपत्ती काही धनदांडग्यांच्या हातात राहीलीये का?”यावेळी कोल्हे शेतकऱ्यांबद्दल बोलताना म्हणाले की, “कीटकनाशके आणि खतांच्या किमतीमध्ये ४ते५ टक्क्यांनी वाढ झाली याचा उल्लेख नाही केला. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमध्ये हस्तक्षेप करण्याच्या वार्ता केल्या, मात्र, जेव्हा शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकतं होते, तेव्हा त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकार नाही गेलं. ” भाषणाचा शेवट करताना अमोल कोल्हेंनी नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि सोबतचं कानही टोचले. ते म्हणाले की, “या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? या वाक्याचं मोदींनी चिंतन केलं पाहिजे.”

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!