Monday, October 14, 2024
Homeइतरसणसवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे...

सणसवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सरपंच स्नेहल भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

सणसवाडी येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वागत करताना सरपंच स्नेहल भुजबळ,माजी सरपंच सुनंदा दरेकर व ग्रामस्थ

कोरेगाव भीमा –

सणसवाडी ( ता.शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देत नागरिकांच्या आरोग्याविषयी मूलभूत व अत्यावश्यक प्रश्न सोडवावा अशी मागणी सरपंच स्नेहल भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाला सोडवण्यासाठी सणसवाडी ग्राम पंचायत आग्रही असल्याचे दिसत आहे .

सणसवाडी औदयोगिक नगरीमध्ये लोकसंख्या व कामगार वर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे , त्या अनुषंगाने सदर ठिकाणी आरोग्य केंद्र होण्याची गरज आहे , तशी मागणी देखील होत आहे . सणसवाडी गावासाठी गायरान जमीन उपलब्ध नाही व गावठाण देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्या कारणामुळे , आरोग्य केंद्राच्या उभारणीस जागेचा प्रश्न आहे , त्या संदर्भात ग्रामपंचायत सणसवाडी यांनी आरोग्य केंद्राच्या जागा खरेदी साठीचा ठराव सरपंच स्नेहल राजेश भुजबळ यांच्या अध्यक्षते खाली घेतला आहे . त्या अनुषंगाने आपल्याकडून मार्गदर्शन मिळून जागा खरेदी साठी कारखानदारांकडून CSR फंड मिळणे कामी सहकार्य व्हावे .असे निवेदन सणसवाडी गावच्या सरपंच स्नेहल भुजबळ यांनी गृहमंत्र्यांना दिले आहे.

सणसवाडी येथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून येथे उद्योग व्यवसाय व रोजगारासाठी विविध राज्यातील परप्रांतीय बांधव व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बांधव रोजगारासाठी येत असून यातील बहुतांश कामगार कुटुंबासह सणसवाडी येथे वास्तव्य करतात या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असते.यासाठी जमीन ,निधी यांचाही प्रश्न उपस्थित होत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार ॲड अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य उभे राहील अशी सणसवाडी ग्रामस्थांची इच्छा आणि विश्वास आहे.

सणसवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले गेल्यास सणसवाडी,दरेकर वाडी,धानोरे,शेरी , वाडा पुनर्वसन गावांना त्याचा फायदा होणार आहे.

यावेळी सरपंच स्नेहल भुजबळ , माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, , उपसरपंच सागर दरेकर,माजी उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य ॲड विजयराज दरेकर, राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे,नवनाथ हरगुडे,संतोष नरके, माजी सरपंच गीता भुजबळ,मानसिंग पाचुंदकर, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, उद्योजक नवनाथ दरेकर,राजेश भुजबळ,संगीता हरगुडे,कुंदा हरगुडे,संध्या नरके,गणेश भुजबळ,दत्ता भुजबळ, सचिन भुजबळ,रामदास दरेकर ,सुभाष नरकेउपस्थित होते.

सणसवाडी येथे उद्योग व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी आमदार अशोक पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरपंच स्नेहल भुजबळ

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!