Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमसणसवाडी येथून वोडाफोन आयडिया कंपनीच्या ७ लाख १४ हजार रुपयांच्या  टॉवर कार्डची...

सणसवाडी येथून वोडाफोन आयडिया कंपनीच्या ७ लाख १४ हजार रुपयांच्या  टॉवर कार्डची चोरी…

सणसवाडी (ता.शिरूर) सणसवाडी येथील एका पत्राशेड गोडावून  मधून वोडाफोन आयडिया कंपनीचे ७ लाख १४ हजार १७५ रुपयांची टॉवर कार्ड चोरीला गेल्याची घटना असून अजित किसन शिंदे (वय२९ वर्षे)धंदा ट्रान्सपोर्ट रा. शिंदेवाडी,आणे ता.जुन्नर यांनी शिक्रपितचोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखला केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी किरण शिंदे यांनी नेहमीप्रमाणे पत्रा गोडाऊन रात्री ८ वाजता बंद केले. व दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दि १२ मे  रोजी सकाळी ०८/३० वा सुमारास पत्राशेड  गोडावून उघडल्यावर लक्षात आले की कोणतीतरी अज्ञाताने आतमधील वोडाफोन आयडिया कंपनीच्या ७ लाख १४ हजार१७५ रुपयांच्या जुने टॉवर कार्ड व कॉपर केबल वायर चोरीस गेले आहेत.संबधित प्रकरणाचा सहाय्यक फौदादर मुत्तनवार  अधिक तपास करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!