Monday, March 4, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अवतरली पंढरीची वारी

सणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अवतरली पंढरीची वारी

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम. घेण्यात आला यावेळी पंढरीच्या पायी वारीचे आयोजन करण्यात आले होते.

फुलांनी सजवलेली पालखी, टाळ,वीणा,मृदुंग ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा भक्ती भावाच्या वातावरणात जिल्हा परिषद शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या रूपात अवघा वैष्णवांचा मेळा अवतरला होता. बाळ रूपातील वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झाले होते यावेळी उपस्थित पालक व पाहुणे यांनाही पंढरीच्या वारीचा अनुभवा आला.
यावेळी सणसवाडी ग्राम नगरीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, ग्राम पंचायत सदस्या शशिकला सातपुते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल दरेकर, समिती सदस्य स्वाती दरेकर, जान्हवी गायकवाड, विक्रम दरेकर, मुख्याध्यापक भंडारे सर, यांच्यासह पालक ,ग्रामस्थ व विविध मान्यवर उपस्थिती होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!