Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडासणसवाडी ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे  यांचे अपघाती निधन

सणसवाडी ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे  यांचे अपघाती निधन

दत्तात्रय हरगुडे यांचे निधन झाल्याचे समजताच गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करत वाहिली अनोखी श्रद्धांजली 

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) पुणे – नगर महामार्गावर पायी चालणाऱ्या माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे व दगडु दरेकर पाठीमागून गाडीने धडक दिल्याने दोनजण जखमी झाले होते. यामध्ये सणसवाडी गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांना डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते तर दगडू दरेकर हे किरकोळ जखमी झाले होते.

सणसवाडी येथील दरेकर बिर्याणी शेजारी वर्षश्राद्ध कार्यक्रमाला हजेरी लावून पुण्याच्या दिशेने आपल्या गाडी जवळ जात असताना पायी चाललेल्या दत्तात्रय हरगुडे व दगडु दरेकर यांना गाडीने जोरात धडक दिल्याने दत्तात्रय हरगुडे यांचा मागील बाजूस तोल जाऊन डोक्याला गंभीर जखम झाली होती, तर दगडू दरेकर यांना मुका मार लागला. हरगुडे यांना जबर मार लागल्याने तातडीने त्यांना उपचारासाठी खाजगी  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची शुद्ध हरपली होती मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .

स्वराज्य राष्ट्र
माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे

माजी उपसभापती आनंदराव हरगुडे यांचे सख्खे पुतणे, उद्योजक नामदेव हरगुडे यांचे चिरंजीव व सणसवाडी ( ता.शिरूर) ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य दत्तात्रय नामदेव हरगुडे यांचे अपघाती निधन झाल्याने सणसवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी दुःख व्यक्त करत ऐन तारुण्यात निधन झाल्याने मोठ्या प्रमाणात शोक व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सदस्य व उपसरपंचपदी बिनविरोध निवड –  सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड व उपसरपंच पदीही बिनविरोध निवड झालेले व उद्योगामध्ये मोठी झेप घेतलेले दत्तात्रय नामदेव हरगुडे हरगुडे यांचे अचानक अपघाती निधन झाल्याने सणसवाडी सह पंचक्रोशीतील नागरिकांनी दुःख व्यक्त केले.

उपसरपंचपदी निवड झाल्यावर गावातील भैरवनाथ आकर्षक फुलांनी सजवले होते तसेच गावातील व पंचक्रोशीतील धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होणे, गोरगरिबांना सढळ हस्ते मदत करणे यामुळे त्यांची सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जुळली होती.अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व त्यांच्या पाठीशी उभे राहणारे हसतमुख दत्तात्रय हरगुडे यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले..

काय सांगता ?? आपले दत्ताभाऊ गेले –    माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांचे अचानक अपघाती दुःखद निधन झाल्याचे अनेकांना  दुःख झाले अनेकजण आश्चर्य व्यक्त करत खरच , काय सांगता आपले दत्ताभाऊ गेले … अशा दुःखद भावना व्यक्त करत होते.

व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केली दुकाने बंद  –  माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांचे निधन झाल्याचे समजताच सणसवाडी येथील किराणा,कापड,सोनार अगदी चहा टपरी, पान टपरी, हॉटेल अशा सर्वांनीच काही वेळात शटर खाली घेत माजी उपसरपंच दत्ताभाऊ यांना अनोखी श्रद्धांजली वाहत दुःखात सहभागी झाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची अंत्यविधीला  उपस्थिती –  समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, गावातील अबालवृद्ध तसेच मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार उपस्थित होता.

माजी उपसभापती आनंदराव हरगुडे यांचे सख्खे पुतणे तर नामदेवराव हरगुडे यांचे चिरंजीव असून त्यांच्या पश्चात  आई, वडील,भाऊ, पत्नी ,दोन लहान मुले, बहिणी ,चुलते,पुतणे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने सणसवाडी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!