कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर)श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आयोजित भव्यदिव्य स्वामी समर्थांची मिरवणूक काढण्यात आली होती . छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापर्यंत पालखी नेत धार्मिक उत्साहात मिरवणूक पार पडली .यावेळी महिला भगिनींनी घरासमोर रांगोळ्या काढत भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचे स्वागत केले.यावेळी वढू बुद्रुक ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.गावाला प्रदिक्षणा घालण्यात आली. यावेळी बाल संस्कार ,युवा संस्कार या विषयावर प्रवचण झाले .लहाण मुलाचे दांडपट्टा, तलवार चालविणे,लाठीकाठी अशी शुर प्रत्यक्षिके केली.
उपस्थित आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणितगुरूपीठ अनातर्गत मोटे साहेब, सरपंच सारीका अंकुश शिवले पाटील, मा. सरपंच प्रफुल्लशेठ शिवले, मा.सरपंच अंकुश शिवले मा.सरपंच अनिल शिवले,उपसरपंच लालाशेठ तांबे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे, कृष्णा उर्फ पप्पू अरगडे, , मा. चेरमण राजेंद्र आहेर, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, योगेश शिवले उपस्थित होते तर सर्वांचे आभार चेरमन संजय शिवले यांनी मानले.