Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहिर साकारली जाणार

श्री क्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहिर साकारली जाणार

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या श्री क्षेत्र देहू येथे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहिर साकारली जात आहे. साधारणतः ९० हजार घनमीटरच्या आकाराची ही विहीर बांधण्यात येईल. या विहिरीला ४,५०० पायऱ्या असणार आहेत. विहिरीलगत निसर्गोपचार केंद्र व ध्यानधारणा केंद्र असणार आहे. पर्यटकांसाठी ही विहिर आकर्षणाचे ठिकाण असणार आहे. अशी माहिती भूमीपूजना प्रसंगी देण्यात आली.

   या विहिरीच्या कामाचा शुभारंभ श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थितीत हाेते. ही विहीर तयार करण्याची कल्पना गुजरात आणि राजस्थान मधील पायऱ्यांची विहिरी पाहून सुचल्याचे सांगण्यात आले.

ही विहिर दोन जर्मन विद्यापीठांनी राबवलेल्या ऊर्जा आणि साठवलेल्या पाण्याचा पुनर्रवापर करून हे पाणी परिसरातील निवासी भागासाठी वापरात आणली जाणार आहे. साधारणतः ९० हजार घनमीटरच्या आकाराची ही विहीर बांधण्यात येईल. या विहिरीला ४,५०० पायऱ्या असणार आहेत.  विहिरीलगत निसर्गोपचार केंद्र व ध्यानधारणा केंद्र असणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही विहिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

यावेळी श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घारगे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, मयूर शिवशरण, प्रा. संदीप भोसले, देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक काळोखे तसेच इव्हो ग्रीनचे संदीप सोनिग्रा, आनंद छाजेड, सचिन कांकरिया, नितीन धोका, आदेश धोका, सागर भसे, शेखर शेलार तसेच सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

विहिर पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून आपली ओळख निर्माण करेल – प्राचीन जलसंधारण तंत्र व स्थापत्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी गुजरात आणि राजस्थान मधील पायऱ्यांच्या विहिरीला भेट देत असताना संदीप सोनिग्रा यांना ही संकल्पना सुचली व ही संकल्पना देहू येथे प्रत्यक्ष साकारली जाणार आहे. ही विहिर पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून आपली ओळख निर्माण करेल. दोन जर्मन विद्यापीठांनी राबवलेल्या ऊर्जानिर्मिती आणि साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर तंत्रज्ञानाचा वापर करून या विहिरीचे पाणी परिसरातील निवासी भागासाठी वापरात आणण्याचे नियोजनही करण्यात येत आहे, अशी माहिती संदीप सोनिग्रा यांनी दिली.

विहिरीचे बांधकाम दगड व चुना या मध्ये करण्यात येणार  – या माध्यमातून प्राचीन जलव्यवस्थापन व प्राचीन बांधकाम याचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. हे संपूर्ण बांधकाम दगड व चुना या मध्ये करण्यात येणार आहे. चुन्याचे मिश्रण तयार करताना गुळाची काकवी, बेलफळाचा आर्क या शिवाय प्राचीन काळातील स्थापत्यकार पाणी जमीनीत झिरपू नये म्हणून जलनिरोधन (वॉटर प्रुफींग) करत होते ते तंत्र वापरले जाणार आहे. प्राचीन स्थापत्य अभियांत्रिकीचा अर्वाचिन अविष्कार या निमित्ताने होणार आहे. या विहिरीत पावसाच्या पाण्याचे जतन करून परिसरातील सुमारे १५ हजार रहिवाशांची पाण्याची गरज भागवली जाईल. याशिवाय भूजल पातळी वाढून संपूर्ण देहू गावाला त्याचा फायदा होणार आहे.

स्टेपवेलच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पायाभरणी झाली. संपूर्णपणे दगडाने बनवलेली ही पायऱ्यांची विहीर पहिल्या टप्प्यात दहा मीटर खोल असेल आणि पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी तिचे उद्घाटन करण्यात येईल व दुसऱ्या टप्प्यात स्टेप वेल वीस मीटर खोल करण्यात येणार आहे. या विहिरीचे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. या परिसरात बांधकामासाठी पर्यावरण पूरक साहित्य वापरण्याव्यतिरिक्त बांधकामा नंतरच्या बाबींमध्ये नवीकरणीय ऊर्जा आणि पायऱ्यांच्या विहिरीतील पाण्याचा संपूर्ण वापर यावर भर दिला जाणार आहे, असे सोनिग्रा यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!