Thursday, September 12, 2024
Homeताज्या बातम्याशिवाजी आढळराव पाटील यांना निवडून आणून चौकार मारत, मागील पाच वर्षांचा कामाचा...

शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून आणून चौकार मारत, मागील पाच वर्षांचा कामाचा बॅकअप भरून काढायचा – अजित पवार

  • आमची निष्ठा जनतेशी… जनतेशी संपर्क न ठेवणे ही गद्दारी कोल्हे यांच्यावर आढळराव पाटलांची टीका
  • शिरूर लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा ठरतायेत निर्णायक
  • निवडणूक संपू द्या..एका एकाला कसा सरळ करतो

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात विकास करायचा पाणी,शेती,वीज,रोजगार, रस्ते, एम आय डीसी,गुंडगिरी,केंद्र व राज्याच्या योजना यांसह विविध मुद्द्यांवर लक्षवेधी भाषण करत शिवाजीराव आढळराव पाटील सर्वसामान्यांतील कामाचा माणूस निवडून आणून मागील पाच वर्षांचा कामाचा बॅकअप भरून काढायचा आहे.त्यांना मागील निवडणुकीत आपण पराभूत केले होते आता त्यांना निवडून आणायचे काम आपले आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सभेत केले.

निवडणूक संपू द्या..एका एकाला कसा सरळ करतो – रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडे वाकडे प्रकार मला ऐकायला मिळतात. त्यांना सरळ करण्याची गरज आहे. फक्त आचारसंहिता संपू द्या काही वेडं वाकडं करत असतील तर त्यांना बघून घेऊ तसेच कोणी दमदाटी करू नये. कष्ट करावेत, कामे करावीत, कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करू, जुन्या व नवीन कंपन्यांमध्ये कामगारांसाठी प्रयत्न करू, मुद्रा लोण, शेतकरी कामगार, केंद्र व राज्याच्या योजना सांगत विकासाला प्राधान्य देण्यात येईल तसेच रांजणगाव एमआयडीसीत वेडे वाकडं प्रकार करणाऱ्यांना सरळ करण्याचा अजित पवारांनी इशारा दिला.

आरक्षण नसताना पोपटराव गावडेंना निवडून देणारा तालुका -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर तालुका हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा असून आरक्षण नसताना आमदार म्हणून पोपटराव गावडे निवडून यायचे. इथे जातीपातीच्या राजकारणाला अजिबात थारा मिळत नाही असे सांगत शिरूर तालुक्याचे कौतुक केले.

आढळराव पाटलांना आपण पाडलं… आता निवडून आणायची जबाबदारी आपली – आढळराव पाटील शिरूर मधून सारखे निवडून यायचे आम्ही उमेदवार द्यायचो.. आता वाटायचं वातावरण चांगल आहे.शिट नक्की येईल… झाली झाली म्हणता आमचा उमेदवार पडायचा. आता आपल्याला आढळरावांना पुन्हा निवडून आणायचे आहे.या भागाचा विकास करायचा आहे.

कोल्हे कलाकार गडी नुसतीच डायलॉग बाजी करतो – कोल्हे यांना निवडून आल्यावर माझ्या व्यवसायावर परिणाम होतो. म्हणून राजीनामा द्यायला निघाले म्हणल लोक काय बोलतील. असे म्हणत डॉ अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवारांनी चांगलीच टीका केली असून सत्तेत सहभागी व्हायचे तेंव्हा शपथ घ्यायला सोबत तेंव्हा असा काय बोलला की काय विचारू नका..शेवटी कलाकार गडी नुसतीच डायलॉग बाजी करतो.. एकदा इकडे एकदा तिकडे अस आपल्याला चालत नाही.एकदा डायरेक्ट सांगितले काय तो निर्णय घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज यांची भूमिका केली असे सांगता तसेच नथुराम गोडसे यांची भूमिका केली हे सांगा.

मशीनवर एकच नंबरला घड्याळ असून बघितल की दाब घड्याळ…घड्याळ अन प्रचंड हशा

अजित पवार यांचा तडफदार व रोखठोक स्वभाव सर्वांनी परिचित असून अनेकदा ते असा काही विनोद करतात की उपस्थित हसून हसून लोटपोट होतात. असाच अनुभव शिरूर करांना आला.बॅलेट मशीनवर एक नंबरला आढळराव पाटलांचे नाव आणि समोर चिन्ह घड्याळ आहे. मतदानाला गेल की वरून बगायचे एक नंबरला घड्याळ.. पाहिलं दाब घड्याळ..नुसतं घड्याळ घड्याळ बटन शोधायचे गरज नाही.

यावेळी दिलीप वळसे पाटील प्रकुत्तीमुळे नाहीत ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून तुमच्या भागात भरपूर मतदान व्हायला पाहिजे असे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी महादेव जाणकारांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर शिरूर मधून आढळराव पाटील निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत सत्तर वर्षात बहुंजम समाजाला संधी देणारे मोदी सरकार आहे असे सांगत आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले.

माजी आमदार पोपट पवार यांनी यांनी दुष्काळी भाग ते बागायती परिसर असा प्रवास सांगत आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले.

आमची निष्ठा जनतेशी… जनतेशी संपर्क न ठेवणे ही गद्दारी – केंद्रातून कोल्हेंनी निधी आणला नाही तसेच सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला नाही. डायलॉग बाजी करून प्रापच चालत नसतो.कायम लोकांच्या सेवेत राहिलो असून मागील वीस वर्षात ८१३ रविवार जनता दरबार घेतले. लोकांच्या अडीअडचणी मध्ये काम केले आहे. आमची निष्ठा जनतेशी आहे.जनतेशी संपर्क न ठेवणे ही गद्दारी आहे.

केंद्राच्या विचाराचा खासदार असल्यावर निधी मोठ्या मिळाल्याने विकास होतो. गतिमान व देशहिताचे निर्णय घेण्याची क्षमता मोदी सरकार असून मोदी सरकार सरकार हे शेतकऱ्याचे सरकार असून मागील पाच वर्ष प्रत्येक शेतकऱ्यांना ६ हजार दिले एका वर्षाला ७२ कोटी पाच वर्षत ३ लाख ७२ हजार कोटी दिलेत. शेतकऱ्यांच्या साठी कांद्यावरील निर्यात बंदी उठवली.प्रचाराची दिशा बदलली कोल्हेंकडे मुद्दे नाहीत, गावभेट व विकास निधी नाही. कोल्हेंनी केंद्र सरकारकडून एकही रुपया निधी आणला नसल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.

आभार मंगलदास बांदल यांनी मानले.यावेळी आजी माजी पदाधिकारी, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना व सह घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते,मतदार तासेचाहीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!