भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवंय – मंगलदास बांदल
बांदलांनी न अडखळता सांगितले.. बुद्धम् शरणम् गच्छामि || धम्मम् शरणम् गच्छामि || संघम् शरणम् गच्छामि…
पुढे असो कितीही मोठे आव्हान.. नेता आमचा सामर्थ्यवान… बांदल समर्थकांची प्रचारात आघाडी
शिक्रापूर – “भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचविण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या ( भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) नातवाने ( प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर )उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवं,” असे ‘वंचित’ने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपली कृतज्ञता आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी शिक्रापूर ग्रामनगरीचे सरपंच रमेश गडदे, ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे,युवराज मांढरे, अनिल राऊत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगलदास बांदल यांनी भगवान गौतम बौध्द यांचे बौध्द यांचे विचार व बुद्धम् शरणम् गच्छामि || धम्मम् शरणम् गच्छामि || संघम् शरणम् गच्छामि असे न अडखळत तोंडपाठ सांगत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तसेच त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपली राजकीय भूमिका मांडली.
शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये ‘वंचित बहुजन आघाडी’ने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने शिरूर लोकसभा निवडणुकीत आता ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघातून यापूर्वीच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे , त्यामुळे आता शिरूर लोकसभा लढत दुरंगी नाही, तर तिरंगी लढत आता होणार आहे.
बांदल कोणाची उडवणार धांदल – पैलवान असलेले मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबी पणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. दहावा,बैलगाडा घाट , लग्नसमारंभ अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वसामान्य लोकांमध्ये बांदलांच्या भाषणाची चांगलीच चर्चा पाहायला मिळते.यावेळी ते नेमकी कोणाची धांदल उडवतात हे आगामी काळात पाहायला मिळेल.
बांदल यांची प्रचारात आघाडी – उमेदवारी जाहीर होऊन एक दिवस होत नाही तर पत्रकार परिषद तसेच गाड्यांच्या काचांवर मंगलदास बांदल यांचा फोटो व पुढे असो कितीही मोठे आव्हान.. नेता आमचा सामर्थ्यवान..खासदार २०२४ असा मजकूर झळकला असून प्रचारात बांदल यांनी आघाडी घेत असल्याचे दिसत आहे.
यावेळी बांदल यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खासदार अमोल कोल्हे यांना मिश्किल चिमटे काढले. तसेच बांदल यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील लोकांच्या सुखदुःखात कायम सहभागी होत असतो तसेच शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, मार्केट कमिटी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य,सभापती, २००९ ची विधानसभा निवडणुकीत चाळीस हजार मते मिळवल्याचे तसेच स्वर्गीय कै. माजी गृहराज्य मंत्री आमदार बापूसाहेब थिटे यांचे एक कोटी रुपयांचे स्मारक बांधले तसेच त्यांच्या नावाने वाचनालय सुरू केले. पदाच्या मध्यामतून बंधारे बांधले असल्याचे सांगत सांगत शिरूर लोकसभेसाठी दंड थोपटले आहे.