Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रशिरूर लोकसभेचे खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येत गाठणार संसद थेट......

शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येत गाठणार संसद थेट… म्हणून कार्यकर्त्याने दिले पेन व डायरी भेट

नितीन कुसेकर यांच्याकडून आढळराव यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा

कोरेगाव भिमा – शिरूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेग घेत असून पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील भेटी दरम्यान माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अनोखा सत्कार मात्र सध्या चर्चेचा विषय ठरला असून घड्याळ चिन्हावर आढळराव पाटील निवडून येतील आणि ग्रामीण भागातील विविध समस्या मांडून अनेक प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त करत नितीन कुसेकर यांनी आढळराव यांना पेन व डायरी भेट देत विजयी खासदार म्हणत शुभेच्छा देत अनोखा सत्कार केला.

    शिरूर लोकसभा मतदार संघातील पिंपळे जगताप येथील  भेटी दरम्यान एक आगळा वेगळा अनुभव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट ) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व उपस्थित नेते,कार्यकर्ते व ग्रामस्थांना  एक सुखद अनुभव आला असून उपस्थितांनी मात्र याबाबत कौतुक केले तर कार्यकर्त्यांना यामुळे प्रचार करण्यासाठी उस्ताह व आनंद देणारा एक प्रसंग घडला असून यावेळी ग्रामस्थांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

    माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील  यांचा गाव भेट नियोजित कार्यक्रम होता.यावेळी पिंपळे जगताप येथील नितीन कूसेकर यांनी  सर्वसामान्य जनतेच्या मनातील व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, अनेक प्रश्न मार्गी लावणारे, लोकांना भावणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत. त्यांना शुभेच्छा व विश्वास म्हणून निवडून आल्यावर शपथ झाली की या पेनाने पहिली सही करतील व या मतदार संघातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यांना मार्गी लावण्यासाठी या डायरीचा उपयोग होईल म्हणून प्रेमापोटी त्यांना पेन व डायरी भेट दिल्याची माहिती नितीन कुसेकर यांनी दिली.

   यावेळी माजी प्रवक्ता चंदन सोंडेकर यांनी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून तर येतील व मागील तीन वेळा खासदार आणि ही चौथी वेळ निवडून आल्याने त्यांना पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशा शुभेच्छा दिल्या.

  यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, रावसाहेब दादा पवार घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब फराटे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिवसेनेचे अनिल काशीद, भारतीय जनता पक्षाचे भगवान सोनवणे, सरपंच सोनल अशोक नाईकनवरे,उपसरपंच रेश्मा कुसेकर, पिंपळे जगताप ग्रामस्थ, भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार  पदी निवडुन नक्कीच येतिल  व मंत्रीमंडळात सहभागी होतील.मतदार संघाचे १०० टक्के प्रश्न मांडतील यासाठी त्यांना डायरीभेट तर खासदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिली सही करण्यासाठी पेन दिला देवुन मनःपूर्वक सन्मान करण्यात आला. – नितीन कूसेकर, ग्रामस्थ पिंपळे जगताप

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!