Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याशिरूर लोकसभा मतदार संघात मोठी घडामोड... शिवाजी आढळराव पाटलांसाठी दिलीप वळसे पाटील...

शिरूर लोकसभा मतदार संघात मोठी घडामोड… शिवाजी आढळराव पाटलांसाठी दिलीप वळसे पाटील मैदानात…

बेट भागासह शिरूर, खेड,आंबेगाव,जुन्नर मध्ये घडामोडींना वेग

घड्याळाला बहुमत देऊन शिवाजीराव आढळराव पाटलांना विजयी करा – दिलीप वळसे पाटील

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे.अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांचा निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, आपण विचारपण करू शकत नाही की, सुरूवातीचे तीस वर्ष आपली मुलं परदेशी असतील, तिकडे राहतील अन् व्यवसाय करून स्वत: च्या पायावर उभी राहतील. मला नाही वाटत की माझ्याही वडिलांनी किंवा माझ्याही आजोबांनी असा कधी विचार केला नव्हता की त्यांच्या घरातलं कोणी कधी परदेशी जाऊ शकेल, परंतु आता सगळं काही शक्य झालं आहे.

गेल्या तीस वर्षात आपल्या मागास भागात जो विकास झाला आहे. जी विकासाची गती आली आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे दुरदृष्टी ठेवणारे नेते आपल्याकडे आहेत. त्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. दिलीप वळसे पाटील साहेबांचा आपल्या सगळ्यांसाठी हा निरोप आहे. की येत्या १३ मे ला घड्याळ्याच्या समोर बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटलांना भरघोस मतांनी विजयी करून द्यायचा आहे. असे आवाहन देखील पुर्वा वळसे पाटीलांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

दिलीप वळसे पाटील हे मैदानात सक्रिय झाल्याने शिरूर, बेट भाग,आंबेगाव ,जुन्नर खेड येथील वळसे पाटलांना मोठा वर्ग आहे. विकास कामे व कार्यकर्त्यांचे जले,सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली नाळ यामुळे दिलीप वळसे पाटील मैदानात उतरल्याने याचा मोठा फायदा शिवाजीराव आढळराव पाटील यांना होणार आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते महायुतीच्या कोणत्याही प्रचार सभेत दिसत नाहीत. बारे झाल्यावर आपण प्रचारात सहभागी होवू असे त्यांनी सांगितले होते. मात्र, निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने दिलीप वळसे पाटील त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!