Tuesday, July 16, 2024
Homeक्राइम शिरूर येथील अंगणवाडीतुन  टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी,कुकर इतर किराणा वस्तुंची...

 शिरूर येथील अंगणवाडीतुन  टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी,कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी

शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडे मळा येथील अंगणवाडीतील टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी,कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी झाल्याची घटना घडली असून आता चोरांनी अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आहारासाठी असलेल्या साहित्यावर डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.(Crime News)

शिरूर पोलीस स्टेशन येथे  रोहीणी अशोक बो-हाडे (वय ४८ वर्षे)  रा. बो-हाडे मळा, रामलिंग यांनी तक्रार दिली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार  अंगणवाडी, बो-हाडेमळा येथे दि.१८ जून रोजी दुपारी २ ते १९ जून रोजी सकाळी साडे आठच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने अंगणवाडीचे कुलुप कोंडा तोडत एल सी डी टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी केली आहे. ( Pune Gramin Police)

 एकूण १४,३००/- रूपये किंमतीचा मुददेमाल चोरत किराणा वस्तुची नासधूस करून नुकसानही या अज्ञात चोरटयाने केले आह सदर  गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनखाली पोलीस नाईक अशोक शिंदे करत आहेत.(Pune)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!