Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमशिरूर तालुक्यासह कोरेगाव भिमा येथे अज्ञात ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, मोबाईलमध्ये...

शिरूर तालुक्यासह कोरेगाव भिमा येथे अज्ञात ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड

पुणे – पुण्यातीळ ग्रामीण भगती मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्याच्या घजाताना व त्या अनुषंगाने बातम्या समोर येत आहे. या अज्ञात ड्रोनने पुणेकरांची झोप उडवली आहे.ग्रामीण भागात नागरिक हैराण झाले असून भीतीयुक्त वातावरण निर्मिती तयार झाली आहे.

वेगवेगळ्या भागात रात्री ११ ते २ वाजेच्या दरम्यान ड्रोन घिरट्या घालताना दिसतात. दररोज एकाच वेळी ३ ते ६ ड्रोन घिरट्या घालत आहेत. या सगळ्या प्रकारामुळं नागरिकही धास्तावले आहेत. कोरेगाव भिमा येथे रात्रीच्या वेळी अचानक ड्रोन दिसू लागल्याने नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागत असून याबाबत मोबाईलवर व्हिडिओ देखील काढण्यात आले असून या ड्रोनचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रस्थ करत आहेत.

रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या ड्रोनमुळं नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांमध्ये ड्रोनच्या घिरट्यांनी भीतीचं वातावरण आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी तर केली जात नाही ना? असा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनाही अद्याप याचा तपास लागत नसल्याने, ड्रोनचं गुढ कायम. ड्रोन नक्की कोण उडवतयं? त्यामागचा उद्देश कायं?याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

शिरूर तालुक्यातही ड्रोनच्या घिरट्या -पुण्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या सुरुच असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या तीन दिवसांपासुन शिरुर तालुक्यातील कोरेगाव भिमा, मलठण, बाभुळसर, कारेगाव, रांजणगाव, बाभूळसर, वरुडे, खंडाळे माथा या परिसरात ड्रोन घिरट्या घालताना दिसुन आले आहेत. तर बाभुळसर येथे नागरिकांनी ड्रोन ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केलं मात्र ड्रोनच्या माध्यमातून ग्रामीण भागात रेकी का केली जाते याचं उत्तर अद्यापही नागरिकांना मिळत नसल्याने नागरिक भितीच्या छायेखाली असून ड्रोनच्या रेकीचा पोलीसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!