Friday, June 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीशिक्रापूर येथे साई व समर्थ करंजे यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती

शिक्रापूर येथे साई व समर्थ करंजे यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती

ग्रामीण भागातील अत्यंत देखणी व सुबक कलाकृती साकारली दोन सख्या लहान भावांनी

शिक्रापूर – दिनांक २२ ऑक्टोंबर

शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील साई सचिन करंजे व समर्थ सचिन करंजे या दोन सख्या भावांनी स्वराज्याची राजधानी असलेला दुर्ग दूर्गेश्वर किल्ले रायगडाची अत्यंत देखणी,सुबक व नयनरम्य प्रतिकृती साकार केली असून हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांसह बाल चमुंची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

साई व समर्थ या दोन भावांनी किल्ले रायगडाचा नकाशा काढला ,त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करत अत्यंत आखीव रेखीव किल्ला बनवला ,रायगडावर असणारी छञपती शिवाजी महाराजांची समाधी, राजसदर, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा,महादरवाजा,हत्ती तलाव,गंगासागर तलाव, राजभवन, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर,महाराजांची समाधी,टकमक टोक,हिरकणी टोक ,नगारखाना असा सर्व बारकाईने व ऐतिहासिक अभ्यास करत प्रतिकृती साकारली आहे.

सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, भाला हातात घेतलेले मावळे, , भालदार – चोपदार, रणगाडे,वाघ,सिंह,हत्ती, कुस्ती खेळणारे पैलवान तर शेती नांगरणारे शेतकरी ,बुरुजावर तेजाने व डौलाने फडकणारा भगवा झेंडा अशी प्रतिकृती, सोबत रांगोळीचा व हरळीचा केलेला सुबक वापर किल्याच्या प्रतिकृतीचे सौंदर्य वाढवत आहे.

दिवाळी सणाची लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आतुरता लागलेली असते. नवीन कपडे, फटाके, दिवाळीतील सुग्रास व चटकदार फराळासोबत बालचमुंसाठी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो, तो ऐतिहासिक किल्ले बनवण्याचा लहान मुले सध्या किल्ले बनवण्यात व्यस्त असून मराठ्यांच्या इतिहासातील साक्षीदार असलेले व छत्रपती शिवाजी महाराज व छ्त्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले हुबेहूब साकारण्याकडे बालचमुंचा कल असतो.बऱ्याचदा यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करत दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवण्यासाठी लहान मुले अत्यंत उत्साही असतात .अशाच छंदाला जपत साई व समर्थ या दोन भावंडांनी असून अत्यंत सुबक व दिमाखदार पद्धतीने त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने हुबेहूब स्वराज्याची राजधानी असणारा किल्ले दुर्गेश्वर रायगड प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्रापूर परिसरातील नागरिकांसह बाल मित्रमंडळी किल्ला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

करंजे कुटुंबीय हे धार्मिक व सामाजिक उत्तरदायित्व जपणारे कुटुंब असून गरजवंताला व गोरगरिबांना नेहमी मदत करणारे कुटुंब असा नावलौकिक आहे. शाळेसाठी जागा , मुलांना खेळाच्या मैदानासाठी जागा देणे अशी समाजोपयोगी कामे करंजे कुटुंबियांनी केली आहे. वारकरी संप्रदायाच्या विचारांचा वारसा असणारे कुटुंबातील या साई व समर्थ करंजे हे अभ्यासात हुशार असून आजोबा व वडिलांकडून त्यांना इतिहासाची माहिती मिळत असून आजी व आई यांच्याकडून धार्मिक व ऐतिहासिक गोष्टी ऐकायला मिळाल्याने त्यांना रायगडाची प्रतिकृती बनवण्याची प्रेरणा मिळाली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!