Tuesday, September 10, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?शिक्रापूर येथे तीन हजार वृक्षांचे वाटप करत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड 

शिक्रापूर येथे तीन हजार वृक्षांचे वाटप करत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड 

प्रभात फेरिसह, पुढील वर्षी ज्यांची झाडे चांगली बहरलेली असतील त्यांना देण्यात येणार बक्षीस

शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या मा एक दिशादर्शक व अनुकरणीय उपक्रम राबवला असून पर्यावरणास प्रेरक व पूरक असा उपक्रम राबवत तीन हजार वृक्ष  वाटप करणेसह मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली असून पुढील वर्षी ज्यांची झाडे मोठी व बहरलेली असतील त्यांना ग्राम पंचायतीच्या बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी दिली

शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने भव्य स्वरूपात वृक्ष लागवड व वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिक्रापूर विद्याधाम प्रशाला या शाळेचे विद्यार्थी तसेच 1987 सालची दहावीची बॅच तसेच आशा सेविका विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांच्या समवेत शिक्रापूर ग्रामपंचायत पासून मुख्य पेठ पोस्ट ऑफिस जुना पूल तसेच तळेगाव रोड चव्हाण कॉम्प्लेक्स या परिसरातून भव्य स्वरूपात रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, जय जवान जय किसान अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर रॅलीचे रूपांतर भव्य सभेमध्ये होत असताना शिक्रापूर ग्राम पंचायतीचे सदस्य सुभाष  खैरे यांनी सूत्रसंचालन केले तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभाकर जगताप  यांचा सन्मान शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंचरमेश बबनराव गडदे यांच्या हस्ते करण्यात आला.

 आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभाकर जगताप  यांनी लक्ष्मी तरु या झाडाविषयी सविस्तर माहिती विशद केली शिक्रापूर नगरीच्या उपसरपंच सारिका सासवडे यांनी झाडाविषयी माहिती देत झाडांचे संगोपन करण्याचे आव्हान केले.

  विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रे सर यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर १९८७ च्या दहावीच्या बॅचचे रमेश करपे यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच  रमेश गडदे यांनी पर्यावरणाचे महत्व सांगत झाडे लावण्यासाठी प्रयत्न करत असताना टी जागवण्यासाठी  प्रयत्न करायला हवे असे मार्गदर्शन करत  रामायणातील लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि त्या पर्वतावरील जडीबुटी झाडांपासून औषध तयार केले आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाचे प्राण वाचवले अशा प्रकारची झाडांविषयी माहिती देण्यात येऊन पर्यावरण व मानवाचे जिवन हे एकरूप व एकमेकांना पूरक असून  सर्वांनाआव्हान करण्यात आले की पावणायात आलेले झाड पुढील वर्षी ते झाड पाहून एक दोन तीन असे क्रमांक काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या अनुक्रमे पाच हजार , तिन हजार,दोन हजार अशा प्रकारचे ग्रामपंचायत च्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे.

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये ग्रामपंचायत शिक्रापूर चे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे सदस्य प्रकाश वाबळे, विशाल खरपुडे, सदस्या मोहिनी मांढरे , सीमा लांडे, उषा राऊत, बाबासाहेब सासवडे सोमनाथ भुजबळ तानाजी राऊत उत्तम सासवडे , सुरेश थिटे, नंदा भुजबळ, विद्या घाडगे, संपत खरपुडे, बाळासाहेब मांढरे, लंघे सिस्टर, कल्पना ढोकले तसेच विद्याधाम प्रशालेचे शिक्षक वृंद, आशा सेविका, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या शेवटी पूजा भुजबळ यांनी झाडा विषयी माहिती देऊन साधारण तीन हजार झाडांचे वाटप करण्यात आले व सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले व त्यानंतर शिक्रापूर बाजार मैदान या परिसरा मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली तसेच या कार्यक्रमांमध्ये विशेष सहकार्य सारिका  सासवडे यांचे लाभले तदनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!